बाप रे! वडिलांच्या संपत्तीत मुलींचा किती वाटा असतो? पहा काय म्हणतो कायदा..!

Land Property : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की वाढ-वडिलांची संपत्ती (Land Property) म्हटली की त्याकडे सर्वांनीच आपले लक्ष केंद्रित केलेले असते. कारण की त्या संपत्तीवर त्यांचा तितकाच हक्क असतो. पण कित्येकदा आपण बघितले आहे वडिलोपार्जित संपत्तीसाठी भावंडांमध्ये भांडण होतात. इतकेच नव्हे तर हे भांडण कोर्ट कचेरी पर्यंत देखील जाते. यासाठी शासनाने अनेक प्रकारचे नियम, कायदे निर्गमित केलेले आहेत. पण तरीही अजून देखील भावंडांमध्ये बाचाबाची सुरूच आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याला जास्त संपत्ती मिळाली मला कमी संपत्ती मिळाली.

अशा नागरिकांसाठी आम्ही सांगू इच्छितो की, संपत्तीची वाटणी शासकीय पद्धतीने भावंडांना निम्मी करून दिली जाते. पण यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या मुद्द्यावर विचार केला तर याचा नक्कीच भावंडांवर देखील फरक पडू शकतो. चला तर मग संपत्तीबाबतचा हा नक्की मुद्दा कोणता सविस्तर जाणून घेऊया.

Land Property : जवळपास सर्वत्रच वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी करण्याबाबत किंवा मिळवण्याबाबत नागरिकांमध्ये बरेच गैरसमज होतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहित असलेल्या कायद्यांची अपूर्ण माहिती. तर आम्ही आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला याच कायद्याविषयी माहिती सांगणार आहोत. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्तीचे कशाप्रकारे किती वाटे होत असतात. हे देखील सांगणार आहोत तरी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

वडिलांच्या मालमत्तेत मुलींचा किती वाटा असतो?

सर्वात प्रथम वडिलोपार्जित संपत्तीकडे बघण्याआधी एका प्रश्नाकडे लक्ष देऊया तो प्रश्न म्हणजे; आपल्या देशातील मुलींना वडिलांच्या संपत्ती मध्ये कितपत अधिकार आहे? या प्रश्नाच्या उत्तराकडे बघितले तर सहसा वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी जास्त करून मुलींना मिळतच नाही. पण याबाबतचा एक कायदा आहे. त्यामुळे संपत्तीच्या वाटणीबाबत कोणीही गोंधळून जायचे कारण नाही. शासनाने मालमत्तेची विभागणी करण्यासाठी विविध कायदे निर्गमित केले आहेत.

भारत देशा अंतर्गत सर्वच धर्मासाठी हा कायदा स्थिर आहे. संसदेच्या अंतर्गत देखील काही कायदे बनवण्यात आले आहेत. तर मित्रांनो वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीचा हक्क किती असतो याबाबतचा कायदा काय सांगतो; हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 अंतर्गत भारत देशातील हिंदू आणि मुस्लिम प्रवर्गातील नागरिकांसाठी त्यांचे वैयक्तिक कायदे आहेत यासोबतच ख्रिश्चन नागरिकांसाठी देखील कायदे निर्गमित केलेले आहेत.

वडिलांच्या मालमत्तेत मुलींचा वाटा किती असतो?

आतापर्यंत मुलींसाठी कायदा काय सांगत आलेला आहे, तर वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत एक-दोन पिढ्या पुढे गेल्या की संपत्तीवरील मुलीचे हक्क हे जवळपास कमी होत जातात. परंतु 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायद्यांतर्गत काही विशिष्ट बदल करण्यात आले आहेत. त्या कायद्यामध्ये महत्त्वाचा बदल असा सांगत आहे की, वडिलोपार्जित संपत्ती मध्ये जितका हक्क मुलाचा असणार आहे तितकाच हक्क मुलीचा असेल.

वडिलोपार्जित संपत्ती मध्ये मुलीला हक्क कधी मिळत नाही?

यामध्ये दुसरा कायदा असे सांगत आहे की; एखाद्या मुलीने स्वतःहून तिच्या वारसा हक्काचा त्याग केलेला असेल तर अशावेळी तिचा संपत्तीवर कोणताही अधिकार राहत नाही. मग ही संपत्ती वडिलांच्या कष्टाची असो किंवा वडिलोपार्जित असो. जर एखाद्या मुलीने लॉटरी बोर्डवर सही करून तिचा वाटा सोडलेला असेल आणि अशावेळी त्या कागदपत्रांची शासकीय नोंदणी झाली असेल तर संपत्तीमध्ये मुलीचा कोणताही अधिकार राहत नाही.

जर वडिलांनी स्वतः मिळवलेल्या संपत्तीला मृत्युपत्रामध्ये मुलींना नाकारले असेल आणि अशावेळी त्या मृत्युपत्राची नोंद झाली तर त्या मुलींचा संपत्तीवर कोणताही अधिकार राहत नाही.

परंतु ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे ते म्हणजे वडिलांनी स्वतः घेतलेल्या मालमत्ते साठी मृत्युपत्र तयार करू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात वडिलांना कोणतेही मृत्युपत्र तयार करता येत नाही. म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती मध्ये एखादी व्यक्ती मुलीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही…

महत्वाचे – वरील माहिती इंटरनेट वर असलेल्या माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे, कृपया माहितीची खात्री करून घ्यावी

Leave a Comment