काय सांगता! फक्त 18 लाखांत घर; पहा स्वस्तात मिळणार्‍या या घरांचा व्हिडिओ..!

Mhada Flat Pune : तुम्ही देखील कमी किमतीत घर घेण्याचे स्वप्न पाहत आहात का? तर मग म्हाडा तुमचे हे स्वप्न पूर्ण करणार आहे. आता पुण्यात म्हाडाचे घर (Mhada Flat Pune) तुम्हाला खरेदी करता येईल. कारण आता या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पुण्यात म्हाडाची लॉटरी (Mhada Lottery Pune) निघण्याची शक्यता आहे. पुणे मंडळाच्या जवळपास 5 हजार एवढ्या घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार आहे.

विशेष बाब म्हणजे सगळ्या उत्पन्न गटांसाठी ही घरे बांधण्यात येत आहे. यामधील अत्यल्प उत्पन्न गटामधील घरांची अंदाजे किंमत 18 लाख रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहनिर्माण मार्केटमध्ये (Construction market Pune) याच घरांची किंमत अंदाजे 50 लाखांच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही घरे आतून कशी दिसतात? हे तुम्हाला बघायचे आहे का? चला तर मग पाहूया या घरांची एक झलक.. औरंगाबाद, कोकण आणि पुणे याठिकाणी ही घरांची लॉटरी (House Lottery Konkan, Pune) काढण्यात येणार असल्याचं समजते. तुम्ही या घरासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असाल तर नक्कीच भरा.

कमी किमतीत मिळणारे घर कसे दिसते?

येत्या लॉटरीत पुणे येथील 5 हजार घरांचा (2 BHK flat in Pune) समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घरांची अंदाजे किंमत 18 लाख रुपये या किमतीपासून सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे, पण हे सर्व अधिकृत जाहिरात आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

आपले हक्काचे घर असावे असं सगळ्यांनाच वाटतं असतं. पुण्यामधील घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढतं चालल्या आहे. अशा परिस्थितीत म्हाडाद्वारे बांधण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून नागरिकांचं कमी पैशांत घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सोशल मीडियावर घराचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घरं पाहून तुम्ही घरासाठी अर्ज भरण्याचा प्रयत्न नक्की कराल.

लॉटरी नेमकी कधी जाहीर होणार?

मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या जवळपास 10 हजार एवढ्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यात पुण्यामधील 5 हजार घरांचा आणि कोकण विभागामधील 4500 घरांचा तसेच औरंगाबाद विभागामधील 600 एवढ्या घरांचा समावेश आहे. या तिन्ही मंडळामधील घरांची जाहिरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 25 ऑगस्टपासून अर्जांची विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment