तयार रहा! यादिवशी तब्बल 10 हजार घरांची लॉटरी, आता म्हाडाचे घर मिळवा खूप स्वस्तात..!

Mhada Lottery 2023 : आपलं स्वत:चं पक्क घर रहावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठे नियोजन करण्याची गरज असते. कारण, घराच्या किंमती खूप असतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे शक्य न झाल्याने अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने नाईलाजाने तडजोड करून हक्काचे घर विकत घ्यावेच लागत आहे. अशा परिस्थितीत आता तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण, म्हाडा (Mhada) परत एकदा तुमचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची मदत करणार आहे. म्हाडा ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा घराची सोडत काढणार आहे. 

म्हाडाची मुंबई मंडळामधील 4 हजार 82 घरांसाठीची सोडत (Mhada Mumbai Lottery 2023) अलीकडेच पार पडलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे आणि कोकण तसेच औरंगाबाद मंडळांमधील घरांसाठीच्या सोडती संदर्भात वक्तव्य केले असल्याचा बातम्या प्रकाशित झाल्या आहे. त्यानुसार आता पुणे मंडळातील (Mhada Lottery Pune) 5 हजार घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची महत्वाची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

या लॉटरीत घरांचा आकडा मोठा… 

येत्या ऑक्टोबर महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीकरिता म्हाडाद्वारे कोकण आणि पुणे तसेच औरंगाबाद यासाठी तब्बल 10 हजार एवढी घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहे, या लॉटरीत घरांचा आकडा मोठा आहे. या सोडतीत पुण्यामधील 5 हजार, कोकण मंडळातील जवळपास 4500 हजार घरे तर औरंगाबाद मंडळातील जवळपास 600 घरांचा समावेश असणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजे याच हप्त्यात 25 ऑगस्ट रोजी सोडतीसाठी 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर लगेच अर्ज विक्री-स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे.

‘या’ सोडतीवरही लक्ष ठेवा (Mhada Lottery Thane, Dombivli)

ठाणे (Thane), डोंबिवली तसेच अजून इतर ठिकाणच्या जवळपास 4500 हजार घरांसाठी ऑगस्टच्या शेवटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे लक्षात घेता या सोडतीवर देखील लक्ष ठेवणं मोठं फायद्याचं ठरेल. येणार्‍या काळात औरंगाबाद मंडळाने सुद्धा अंदाजे 600 एवढ्या घरांसाठीच्या सोडतीच्या जाहिरातीसाठीची (Lottery Ad) तयारी सुरू केली असल्याची माहितीही समोर आली आहे. यात औरंगाबाद, लातूर आणि आंबेजोगाई मधील घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

Leave a Comment