म्हाडाच्या कोकणातील घरांसंदर्भात मोठी बातमी; आतापर्यंत घरांसाठी एवढे अर्ज दाखल, अर्ज करण्यापूर्वी पहा घरांना कसा मिळतोय प्रतिसाद..!

Mhada Konkan Lottery 2023 : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये सलग दुसर्‍यांदा सोडत काढण्यात आली असून या सोडतीला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होऊन 20 दिवस झाले असले तरी देखील अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या आतापर्यंत 5 हजारांचा पल्ला सुद्धा पार करू शकलेला नाही. काल म्हणजेच शुक्रवारी (6 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजेपर्यंत म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Flats) अनामत रक्कमेच्यासह फक्त 3 हजार 840 अर्ज सादर झाले आहेत.

Mhada Konkan Lottery 2023

कोकण मंडळाकडून मे महिन्यात 4 हजार 654 एवढ्या घरांसाठी (Mhada Flats) सोडत काढण्यात आली होती. या सोडतीकरिता अनामत रक्कमेसह 49 हजार 174 अर्ज आले होते. या सोडतीला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. पण प्रत्यक्षात योजनेनुसार 20 टक्के योजनेमधील घरे वगळता बाकी घरांसाठी अर्जच आले नसल्याने 4 हजार 654 पैकी 2 हजारहून जास्त घरे विकलीच गेली नाही.

म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? येथे क्लिक करून पहा बातमी..

त्यात पुन्हा विजेत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात घरे नाकारली. त्यामुळे 2 हजारहून कमी घरांची विक्री मे महिन्यात झालेल्या सोडतीत झाली. मे महिन्यातील सोडतीमध्ये घरे विकली गेली नसल्याने कोकण मंडळाने शिल्लक घरांसह 20 टक्के योजनेमधील उपलब्ध असलेल्या अन्य घरांचा समावेश करून 5 हजार 311 एवढ्या घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली.

मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

अर्जविक्री-स्वीकृतीची ही प्रक्रिया सुरू होऊन आता 20 दिवस उलटले असले तरी आतापर्यंत फक्त 5 हजार 311 घरांसाठी फक्त 8 हजार 293 इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आणि यामधील फक्त 3 हजार 840 एवढ्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज दाखल केले आहेत. हा प्रतिसाद खूपच कमी असल्याने कोकण मंडळाची चिंता वाढविणारा आहे. आता उरलेल्या 10 दिवसांमध्ये अनामत रक्कमेसह 10 हजार तरी अर्ज सादर होतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोकण मंडळाच्या सोडतीला मिळालेला हा आतापर्यंतचा खूपच कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे कोकणामधील घरांना इच्छुक पसंती का देत नाही याचा विचार करण्याची वेळ आता कोकण मंडळावर आली आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

दरम्यानच्या काळात सोडतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची चर्चा म्हाडामध्ये आहे. पण कोकण मंडळामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत असा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. त्याचवेळी विरार-बोळींजमधील घरांना पाण्याची समस्या असल्याने प्रतिसाद मिळत नसून 20 टक्के योजनेमधील घरे निर्माणाधीन असल्यामूळे इच्छुक लोक पुढे येत नसल्याचे देखील या अधिकाऱ्याने सांगितले.

आनंदाची बातमी : आता या लोकांना मिळणार म्हाडाच्या घराची संधी; घराचे स्वप्न पूर्ण होणार..!

Leave a Comment