Mumbai Property : आपल्या देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईमध्ये हक्काचे घर घेण्याचे बर्याच जणांचे विशेष स्वप्न असते. याच कारणामुळे कदाचित लोकं मुंबईत महागडे फ्लॅटसुद्धा (Flats in Mumbai) विकत घेतात. तसेच मुंबई शहरामधील एकापेक्षा एक महागड्या डीलबद्दल तुम्हाला ऐकायला मिळाले असेल. लोकं करोडो रुपये खर्च करून मुंबईत आपल्या हक्काचा आलिशान फ्लॅट (Luxurious flat) घेतात. अशाच प्रकारची एक मोठी डील मुंबईत नुकतीच झाली आहे.
Mumbai Property
या डीलमध्ये हा फ्लॅट तब्बल 96 कोटीं रुपयांना विकला गेला आहे. वेस्ट ब्रिज कॅपिटल या गुंतवणूक (Investment) कंपनीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले सुमीर चढ्ढा यांनी 96 कोटी रुपयांमध्ये हा फ्लॅट विकत घेतलेला आहे. मुंबईमधील वरळी परिसरामध्ये या फ्लॅटचे (Flat in Varali) क्षेत्रफळ 6,799 चौरस फुट आहे आणि हा फ्लॅट 60 व्या मजल्यावर आहे. हा फ्लॅट ओबेरॉय रियल्टी लिमिटेडद्वारे विकत घेण्यात आले आहे. हा फ्लॅट विकत घेण्यासाठी खरेदीदार सुमीर यांनी तबला 3.59 कोटी रुपये एवढे मुद्रांक शुल्क भरले आहे.
18 ऑगस्ट रोजी झाली नोंदणी
मिळालेल्या माहितीनुसार हा करार 18 ऑगस्ट रोजी नोंदणीकृत करण्यात आला होता. या फ्लॅटचे बिल्टअप क्षेत्र 7 हजार 459 चौरस फूट म्हणजेच 1.29 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट तर कार्पेट क्षेत्र 6 हजार 799 चौरस फूट म्हणजेच 1.42 लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट असे आहे. या प्रकल्पाला ओएसिस रियल्टीकडून (Oasis Realty) विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये 4BHK आणि 5BHK फ्लॅट बांधण्यात आले असून यात 2 टॉवर देखील आहेत. दुसऱ्या टॉवरमध्ये आलिशान निवासस्थाने (Luxurious flat) असतील. या घरांमधून समुद्राचे दृश्य देखील पाहता येणार आहे…