कसे आहे सिडकोचे 20 लाखाचे घर? पहा सॅम्पल फ्लॅट; सिडकोच्या घरासाठी असा करा अर्ज..!

Cidco Lottery 2024 : मुंबईकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. आता मुंबईकरांना मुंबईत फक्त 20 लाखात घर घेता येणार आहे. सिडकोकडून ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या सिडकोच्या या घरांसाठी (Cidco Flats Navi Mumbai) अर्ज प्रक्रिया सुरू असून 27 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. पण सिडकोची ही स्वस्त घरे नेमकी कशी आहेत? आणि आजूबाजूचा परिसर कसा आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अशातच आता एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ही घरे आणि आजूबाजूचा परिसर दाखवला आहे.

सिडकोकडून प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर 3322 एवढ्या घरांची योजना जाहिर करण्यात आली. या सोडतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आणि सर्वसाधारण घटकांसाठी (LIG) या दोन उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सिडकोची ही घरे नवी मुंबईतील तळोजा नोड आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. यात तळोजा नोडमध्ये 2887 तर द्रोणागिरी नोडमध्ये 435 एवढी घरे आहेत. विशेष म्हणजे फक्त 20 लाखात हे सिडकोचे घर मिळणार आहे. त्यामूळे आता सामान्यांना नवी मुंबईत परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घेता येणार आहे.

सिडकोच्या घरासाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

सिडकोकडून नवी मुंबईतील तळोजामध्ये ही स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असून त्यांची किंमत 21 लाख 71 हजार रुपये एवढी आहे. पण सरकारकडून अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्यामूळे ही घरे 19 लाख 21 हजार रुपये या किमतीची असणार आहेत. त्यामध्ये अजून स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन असा काही खर्च अधिक केल्यास ही घरे तुम्हाला 20 लाखात मिळणार आहे. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सिडकोची घरे कशी आहेत हे पाहू शकता. हा व्हिडिओ आर के प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.

सिडकोच्या घरासाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment