CIDCO Lottery 2023 : नवी मुंबईमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध घरांची लॉटरी याच महिन्यामध्ये जाहीर होईल अशी दाट शक्यता दिसत आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 14000 घरांचा समावेश केला जाऊ शकतो. यामधील जास्तीत जास्त घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी पूर्णपणे राखीव असतील. याच महिन्यामध्ये ही लॉटरी जाहीर झाल्यानंतर लगेचच अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. तरी अर्ज प्रक्रिया सुरू होताच इच्छुक लोकांनी अर्ज सादर करावेत.
केंद्रामध्ये सत्ता आल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे एक मोठे आश्वासन दिले होते. या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील विविध युनिटवर घरांचे बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवली होती. या माध्यमातून नवी मुंबई या ठिकाणी परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाची जबाबदारी सिडकोला दिली होती (navi mumbai 2 bhk flat). सिडको ने नवी मुंबईमध्ये विविध महत्त्वाच्या ठिकाणी तब्बल 14000 घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. ज्याचे लॉटरी पद्धतीने वाटप लवकरच होईल.
मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!
सिडकोच्या या सोडतीमध्ये एकूण 14000 घरे असणार आहेत. यामधील पाच हजार घरे खास अत्यल्प उत्पन्न गटासाठी पूर्णपणे राखीव ठेवले आहेत. तसेच उर्वरित जी घरे आहेत ती सर्व अल्प उत्पन्न गटासाठी देण्याचे निश्चित केले आहे. नवी मुंबई मधील अकरा वेगवेगळ्या विभागात ही घरे आहेत. या विभागांमध्ये कळंबोली, तळोजा, घणसोली, खारघर या परिसराची नावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहेत (CIDCO Lottery news). अत्यल्प उत्पन्न गटामधील घरांचे क्षेत्रफळ हे 25.65 चौरस मीटर इतके असणार आहे. तर अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ 29.25 चौरस मीटर इतके असणार आहे.
बाप रे! मुंबईत घरभाडे वाढले; आता एवढे पैसे मोजावे लागणार..येथे क्लिक करून पहा एरियानुसार घर भाडे..!
सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून जा नागरिकांच्या नावावर संपूर्ण देशभरात कुठेही घर नाही असे सर्व नागरिक या घरांसाठी अर्ज करू शकतील. प्रधानमंत्री आवास योजना गृहनिर्माण लॉटरी प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरिता सर्वात प्रथम नोंदणी करावी लागणार आहे (CIDCO Lottery apply online). अर्ज करणारी व्यक्ती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करून सिडकोच्या या घरांच्या लॉटरी प्रक्रियेसाठी अर्ज सादर करू शकतील.