घर घेण्याआधी या गोष्टींकडे लक्ष द्या? नाहीतर होईल फसवणूक; पहा कामाची बातमी;

Home buying rule in india: घराची किंवा फ्लॅटची विक्री करण्या आधी बिल्डरांनी सर्वात प्रथम महारेराचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. जेणेकरून फसवणूक होणार नाही. परंतु तसे बघायला गेले तर या गोष्टीकडे सर्वजण कानाडोळा करतात. त्यामुळे घर घेत असताना ग्राहकांची फसवणूक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. व्यवहार करत असताना ग्राहकांनी सर्व बाजू तपासाव्यात. असे आवाहन महारेराच्या माध्यमातून केले आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे महारेराने जे प्रकल्प असतील त्यांच्या सर्व प्रकारच्या जाहिराती सोबतच क्यूआर कोड छापणे गरजेचे आहे (home buying tip’s). वर्तमानपत्रातील ज्या जाहिराती असतात त्यांच्या शिवाय ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक अशा जाहिरातींवर सुद्धा लक्ष ठेवले जात आहे.

खरेदी करणाऱ्या व्यक्तींना निर्णय घेणे शक्य होणार?

बिल्डरणा त्या प्रकल्पाविषयी प्रत्यक्षपणे माहिती उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. या माहितीच्या माध्यमातून मानांकन ठरणार आहे. त्यामुळेच घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना अभ्यासपूर्व तसेच विश्वासार्ह निर्णय घेणे शक्य होईल.

अरे वा! मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

घरबसल्या संपूर्ण स्थिती कळवावी;

अगदी घरबसल्या घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला प्रकल्पाची संपूर्ण स्थिती कळवली पाहिजे. यासाठी तीन चार आणि पाच अशी प्रमाणपत्रे बिल्डर लोकांनी दर तीन महिन्यानंतर तसेच प्रत्येक वर्षाला संकेतस्थळाच्या माध्यमातून सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर पुढे घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीसमोर काही विविध अडचणी असतील तर त्या सोडवण्याकरिता समर्पित ग्राहक तक्रार निवारण अधिकारी त्या ठिकाणी नेमून द्यावा (buying house in india). तसेच त्याचे नाव संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी व वेबसाईटवर सार्वजनिक कारणे अशा गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

बाप रे! मुंबईत घरभाडे वाढले; आता एवढे पैसे मोजावे लागणार..पहा एरियानुसार घर भाडे..!

तक्रारीसाठी काय उपायोजना असतील?

घर खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी बिल्डरांनी आपापल्या प्रकल्पांकरिता विविध तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. असे आवाहन महारेराच्या माध्यमातून केले आहे.

मुंबईत स्वस्त घर मिळणार; गोरेगाव येथे मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची घरे..

तक्रारीसाठी काय?

या कक्षामध्ये या कामासाठी समर्पित असणारा किमान एक तक्रार निवारण अधिकारी असणे खूपच गरजेचे आहे. तसेच त्याचे नाव संपर्क क्रमांक त्या ठिकाणी ठळकपणे प्रदर्शित करावा. गृहनिर्माण प्रकल्पांच्या विविध प्रस्तावित निकषाप्रमाणे महारेराच्या माध्यमातून अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

23 जानेवारी नंतर नोंदणीकृत झालेले विविध गृहनिर्माण प्रकल्प यांच्यासाठी पात्र राहणार. दर सहा महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे की, हे मानांकन 24 एप्रिल पासून सुरू होईल. यासाठी प्रकल्पांचा 1 ऑक्टोंबर पासून 24 मार्च हा कालावधी निश्चित केला जाईल. हे मानांकन आहे ते माहेरा मानांकन सारणी या नावाने ओळखले जाणार आहे.

Leave a Comment