बाप रे! मुंबईत घरभाडे वाढले; आता एवढे पैसे मोजावे लागणार, पहा एरियानुसार घर भाडे..!

Home rent in Mumbai : मुंबईत सातत्याने पुनर्विकासाचे वारे जोमात वाहत आहे. अशावेळी सर्वसामान्य मुंबईकरांसोबत एक आगळीवेगळी समस्या निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे. पूर्व, शहर, पश्चिम उपनगरामध्ये असलेल्या जुन्या चाळी, तसेच इमारतींचे आयुर्मान अपेक्षेपेक्षा जास्तच वाढले आहे. मागील काही वर्षांपासून या सर्व रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अगदी धुमधडाक्यात सुरू होती. याच पार्श्वभूमीवर रहिवाशांना पुढील कमीत कमी तीन वर्षांकरिता भाडेतत्त्वावर असलेल्या घरांमध्ये राहावे लागणार आहे. परंतु मुंबई शहरासोबतच उपनगरांमध्ये मागील काही महिन्यांपासून भाड्याच्या घरांच्या किमती तीव्र वाढल्या आहेत. परिणाम स्वरूप घरमालकांनी त्यांच्या घराचे भाडे कमीत कमी 15 ते 20 टक्क्यांनी वाढवल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

मुंबईमधील बऱ्याच भागांमध्ये कोरोना कालावधीत जे बांधकाम तसेच पुनर्विकासाच्या इमारतींचे बांधकाम मागे पडले होते. अशा प्रकल्पाचे दोन वर्षापासून काम सुरूच होते. यामधील कित्येक रहिवासी भाड्याच्या घरामध्ये तात्पुरते जाऊन राहिले आहेत. या ठिकाणी कित्येक प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्यामुळे तेथील नागरिकांनी भाड्याच्या घरांची शोधा शोध सुरू ठेवली आहे (house rent in mumbai 1bhk). ज्या ठिकाणी मागणी वाढत चालले आहे अशा घर भाड्यांमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच अनामत शुल्कामध्ये सुद्धा मोठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता रियल इस्टेट एजंट यांनी सुद्धा भर टाकला आहे. भाड्याच्या घरांसाठी रियल इस्टेट एजंट च्या माध्यमातून महिन्याच्या भाड्याची रक्कम या ठिकाणी घेतली जात आहे. आपला जास्त फायदा व्हावा यासाठी रियल इस्टेट एजंट ज्यादा भाडे सांगत आहेत.

मुंबईत स्वस्त घर मिळणार; गोरेगाव येथे मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..

करारनाम्यापेक्षा भाडेदर जास्त

पुनर्विकासाच्या कामावेळी विकासाच्या माध्यमातून जी रक्कम भाड्यासाठी दिली होती त्या रकमेची आणि आत्ताच्या भाड्याच्या रकमेची तुलना केली तर मोठा फरक दिसून येत आहे (mumbai house rent price per month). यामुळेच रहिवाशांची चांगलीच कोंडी झाली आहे. काही विकासकांनी यामध्ये वाढ केली असून प्रत्येक विकासक या गोष्टीसाठी अनुकूल नाहीत. यामुळे रहिवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.

आनंदाची बातमी! आता म्हाडा’ला या जिल्ह्यांमध्ये घरे बांधणे होणार सोपे.. येथे क्लिक करून पहा कोणत्या जिल्ह्यात उपलब्ध होणार स्वस्त घरे ?

सुविधांसाठी जास्त दर

विविध इमारती या एकाच वेळी पुनर्विकासासाठी जात आहेत. त्यामुळे भाड्याच्या घरांचा तुटवडा या ठिकाणी निर्माण होत आहे. तसेच रहिवाशांच्या माध्यमातून नोकरी, शाळा, कॉलेज, सुरक्षितता, प्रवास, पाणीपुरवठा, गॅस, पाईपलाईन, शाखाहरी मांसाहार, कितवा मजला, लिफ्ट, अजु बाजूची वस्ती इत्यादी मुद्द्यांवरून रहिवासी घर निवडत आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांना पर्याय नसल्यामुळे जादा भाडे द्यावे लागत आहे.

खुशखबर! आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर..! येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..

मुंबईतील विविध भागांमध्ये असणारा सरासरी भाडे दर;

चेंबूर (युनियन पार्क पेस्तम सागर नगर आरसीएफ कॉलनी सहकार नगर)

१) १ आरके : १२ ते १७ हजार रुपये

२) १ बीएचके : १९ ते २३ हजार रुपये

३) २ बीएचके : २४ ते २९ हजार रुपये

दहिसर, बोरिवली

१) १ आरके : १३ ते १५ हजार रुपये

२) १ बीएचके : २० ते २३ हजार रुपये

३) २ बीएचके : २५ ते ३५ हजार रुपये

घाटकोपर पश्चिम

१) १ आरके : १० ते १४ हजार रुपये

२) १ बीएचके : १९ ते २२ हजार रुपये

३) २ बीएचके : २४ ते २७ हजार रुपये

विक्रोळी-कांजुर

१) १ आरके : ९ ते १२ हजार रुपये

२) १ बीएचके : १६ ते २० हजार रुपये

३) २ बीएचके : २२ ते २५ हजार रुपये

पवई

१) १ आरके : १४ ते १८ हजार रुपये

२) १ बीएचके : २० ते २४ हजार रुपये

३) २ बीएचके : ३० ते ३५ हजार रुपये

मुलुंड (दौलतनगर, किसननगर, चेकनाका)

१) १ आरके : ८ ते १२ हजार रुपये

२) १ बीएचके : १६ ते २० हजार रुपये

३) २ बीएचके : २२ ते २५ हजार रुपये

नवीन घर घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा होईल नुकसान..

Leave a Comment