मुंबईत इथे मिळणार बजेटमध्ये घर (Best Places in Mumbai to buy budget Friendly Home)
मुंबईत कमी पैशात घर (2 bhk flat Mumbai) मिळणे अवघड आहे. पण मुंबईत काही भाग असे आहे ज्या ठिकाणी आपल्या कमी पैशात म्हणजेच स्वस्तात घर मिळू शकते.
- बोरीवली –
बोरीवलीला बागेचं शहर म्हणून देखील ओळखतात. मुंबईमध्ये राहण्यासाठी बोरीवली हा एक उत्तम पर्याय समजला जातो. जर का तुम्ही बांद्रा, अंधेरी आणि सांताक्रूज किंवा दादर (Dadar, Mumbai) या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुम्ही ट्रेन तसेच बसने सहज प्रवास करू शकता.
याठिकाणी तुम्हाला चांगले कॉलेज, शॉपिंग मॉल्स आणि हॉस्पिटल अशा सगळ्या सुखसोयी अगदी जवळच्या अंतरावर मिळतील. आपलं स्वत:च घर खरेदी करण्यासाठी तसेच भाड्याने घर घेण्यासाठी तुम्हाला याठिकाणी बजेटमध्ये घर उपलब्ध होईल. याठिकाणी 1 bhk घर (1 bhk flat Mumbai) परवडेल अशा दरात मिळू शकते. तसेच 12 ते 15 हजार रुपयांमध्ये 1BHK भाड्याने राहण्यास मिळू शकते.
ठाण्यात मोक्याच्या ठिकाणी फक्त 11 लाखात घर; ताबडतोब करा अर्ज, येथे क्लिक करून पहा बातमी..
- कांदिवली –
उत्तर मुंबईमध्ये असलेली कांदिवली हे देखील नोकरदार वर्गासाठी तसेच मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्याऱ्या कलाकारांसाठी राहण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे.
कांदीवलीमधून रेल्वे, बस आणि ऑटो रिक्षाच्या मदतीने मुंबईमधील महत्वाची ठिकाणांवर पोहोचणे सहज शक्य आहे. विशेष म्हणजे कांदीवलीपासून एअरपोर्ट (Mumbai Airport) देखील फक्त 14 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. येथे देखील 1 bhk घर (1 bhk flat Mumbai) परवडेल अशा दरात मिळू शकते. आणि 12 ते 15 हजार या दरम्यान भाड्याने घर मिळून जाईल..
बाप रे! मुंबईत घरभाडे वाढले; आता एवढे पैसे मोजावे लागणार, येथे क्लिक करून पहा एरियानुसार घर भाडे..!
- मालाड –
मालाड याठिकाणी बर्याच मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. त्यासोबतच मालाड हे मुंबईमधील सर्वात स्वस्त निवासी शहरांपैकी एक समजलं जातं. याठिकाणी चांगले हॉटेल्स, स्ट्रीट फूड, शॉपिंग मॉल, शाळा आणि चांगल्या दवाखान्यांची सोय आहे. याठिकाणी सुद्धा तुम्हाला बजेट फ्रेण्डली घर (Budget Friendly Home Mumbai) राहण्यासाठी तसेच भाड्याने सहज उपलब्ध होईल.
- चेंबुर-
चेंबुर हे मुंबई (Mumbai) आणि मुंबईमधील बर्याच उपनगरांना जोडणारं एक मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच याठिकाणी बरेच औद्यागिक केंद्रं असल्याने नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी सुद्धा चेंबूर राहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
मुंबईत स्वस्त घर मिळणार; गोरेगाव येथे मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची घरे, येथे क्लिक करून पहा बातमी..
तसेच याठिकाणी विविध आयटी कंपन्या आणि भाभा परमाणू संशोधन केंद्र तसेच पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा प्रसिद्ध असलेल्या कंपन्या आहेत. चेंबूरमध्ये सुद्धा तुम्हाला बजेट फ्रेण्डली घर (Budget Friendly Home Mumbai) राहण्यासाठी आणि भाड्याने सहज मिळून जाईल.
- विक्रोळी-
विक्रोळी हे इशान्य मुंबईमधील सुसज्ज असलेलं असं एक उपनगर आहे. विशेष म्हणजे विक्रोळीत राहण्यासाठी बर्याच चांगल्या निवासी बिल्डिंग आणि सोसायट्या आहेत. मध्य रेल्वेच्या माध्यमातून हे मुंबईच्या इतर महत्वाच्या ठिकाणांना जोडलं गेलं आहे. विक्रोळीत सुद्धा स्वस्तात घर मिळू शकते.
खुशखबर! आता मुंबईजवळ फक्त 10 लाखात घर..! येथे क्लिक करून पहा ठाण्यातील सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती..
- घाटकोपर – (1 BHK flat Ghatkopar, Mumbai)
मुंबईत वास्तव्य करण्यासाठी घाटकोपर हे देखील एक चांगले ठिकाण आहे. मेट्रोमुळे घाटकोपर ते पश्चिम मुंबई असा प्रवास करणे खूपच सोपे झाले आहे. याठिकाणी राहण्यासाठी बर्याच बहुमजली इमारती तसेच रहिवासी सोसायट्या आहेत. येथे देखील बजेट फ्रेण्डली घर मिळू शकते. तसेच 15 ते 20 हजारांमध्ये भाड्याने सुद्धा घर उपलब्ध होईल. महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधील या काही महत्वाच्या ठिकाणांबरोबर तुम्हाला पवई, ऐरोली आणि कुर्ला या ठिकाणी सुद्धा कमी बजेटमध्ये राहण्यासाठी घर मिळू शकते..