राज्यात होणार हवामानात बदल, ‘या’ ठिकाणी तर पावसाची शक्यता..!

राज्यात सध्या उन्हाचा चटका बसायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमान अधिक वाढले आहे, त्यामूळे नागरिकांना गरमीचा सामना करावा लागत आहे. या गरमीपासून बचावासाठी लोक आता वेग-वेगळे पर्याय शोधत आहे. अशा लोकांसाठी एक खुशखबर आली आहे, राज्यात येत्या दोन दिवसामध्ये वातावरणात बदल होणार आहे. त्यामूळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Climate change in the state, possibility of rain in this place)…

तर दुसरीकडे रब्बीच्या हंगामातील पिके शेतकऱ्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे. त्यामूळे वातावरणात बदल होत असल्यामूळे परत एकदा शेतकर्‍यांची चिंता वाढते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक, अहमदनगर व राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

हे पण वाचा

सोयाबीन : आवक वाढली म्हणून घाबरू नका, पहा काय आहे तज्ञांचा सल्ला..!

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात राज्यातील तापमानात घट होणार आहे. बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होत असल्यामूळे ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामूळे राज्यातील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्या आली आहे. राज्यातील कोकण भागात हलक्या स्वरुपात पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

शेतमालाचे ताजे बाजार भाव, हवामान अंदाज व शेती विषयक महत्त्वाच्या माहितीसाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा…

Leave a Comment