मुंबईत खिशाला परवडणारं घर घ्यायचंय? येथे पहा स्वस्त भागांची यादी..!

2 BHK Flats Mumbai : मुंबईतील अनेक लोक पैसे कमावण्यासाठी आणि पैसे कमावून स्वतःच स्वप्नातलं घर घेण्यासाठी धडपडत असतात. मात्र एवढ्याश्या कमाईतून साहजिकच लाखो करोडोचे घर कसे विकत घ्यावे, असा प्रश्न प्रत्येकाला पडतोच. पण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत, जिथे तुम्ही मुंबईत तुमच्या बजेटमध्ये घर (Budget friendly flats in Mumbai) खरेदी करू शकता किंवा भाड्याने घेऊ शकता.

मायानगरी हे मुंबईचे दुसरे नावच आहे. कारण मुंबई अनेकांना आकर्षित करते, अनेक लोक येथे विविध स्वप्ने घेऊन आपला संघर्ष करण्यासाठी येतात. अनेकांची काही स्वप्ने सत्यात उतरतात तर काहींना अनेक मोठ मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. मात्र, मुंबई इथे येणाऱ्या कोणालाही उपाशी झोपू देत नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानीच नाही तर बॉलीवूडचेही शहर आहे.

मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; मुंबईत म्हाडाची 1 हजार घरांची लॉटरी, या दिवशी असणार लॉटरी, येथे क्लिक करून पहा माहिती..

त्यामुळेच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न घेऊन अनेकजण इथे येतात. दररोज अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी मुंबईत येतात, त्यातले बरेच जण इथे स्थायिकही होतात आणि कालांतराने ते कायमचेच मुंबईकर होतात. मुंबईत आपल्याला एखादी चांगली नोकरी मिळावी, आपल्या व्यवसायाचा जम बसावा असे प्रत्येकालाच वाटते. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईत स्वतःच घर (2 BHK Flats Mumbai) घेणं. मुंबईतील प्रॉपर्टी च्या किमती गगनाला भिडल्याने प्रत्येकजण घर खरेदीबाबत चिंतेत असतो. मात्र आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला मुंबईत राहण्यासाठी सर्वोत्तम आणि स्वस्त घरांचे पर्याय कोणते आहेत? याबद्दलच माहिती देणार आहोत.

मुंबईत जागेच्या कमतरतेमुळे, घरे ही 1Rk म्हणजे एक खोली आणि स्वयंपाकघर, किंवा 1BHK, 1 बेडरूम, स्वयंपाकघर आणि लिव्हिंग रूम अशा प्रकरची असतात. येथे आम्ही साधारण मध्यमवर्गीयांसाठी काही परवडणाऱ्या घरांचे पर्याय देत आहोत.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

मुंबईत या भागात मिळणार खिशाला परवडणारं घर (Affordable Flats Mumbai)

  1. बोरिवली

बागांचे शहर म्हणूनही बोरिवलीला ओळखले जाते. मुंबईत कायमचं घर घेण्यासाठी बोरिवली हा एक चांगला पर्याय ठरेल. जर तुम्ही वांद्रे, अंधेरी, सांताक्रूझ किंवा दादर सारख्या ठिकाणी जॉब करत असाल तर तुम्हाला बस किंवा ट्रेन चेंज करण्याची गरज नाही, तुम्ही एकाच ट्रेन किंवा बसने सहज प्रवास करू शकता.

या ठिकाणी, उत्कृष्ट कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि मॉल्स यासारख्या सर्व सुविधा फक्त एका फोन कॉलच्या अंतरावर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला स्वतःच्या मालकीवर किंवा भाड्याने परवडणारी घरे सहज उपलब्ध होतील. तुम्ही बोरिवलीमध्ये रेसिडेंशियल अपार्टमेंटमध्ये 50 लाख रुपयांना देखील फ्लॅट खरेदी करू शकता. सोबतच तिथल्याच एखाद्या टॉवरमध्ये 65-70 लाख रुपयांत तुम्ही घर विकत घेऊ शकता. तसेच भाड्यावर राहण्यासाठी 1BHK फ्लॅट तुम्हाला 12,000 ते 15,000 रुपयांपर्यंत उपलब्ध होईल.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

  1. कांदिवली

उत्तर मुंबईतील कांदिवली हे नोकरदार वर्गासाठी राहण्यासाठी उत्तम ठिकाण तर आहेच, सोबतच मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही उत्तम पर्याय आहे. कांदिवलीहून रेल्वे, बस आणि ऑटोरिक्षाने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी सहज पोहोचता येते. एअरपोर्ट सुद्धा कांदिवलीपासून अवघ्या 14 किमी अंतरावर आहे. हे शहर मुंबईतील अनेक प्रमुख शहरांना जोडले जात असल्याने, कांदिवली एक महत्वाचे शहर बनले आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोडमुळे पश्चिम आणि मध्य उपनगरांमधील प्रवासही सुकर होतो. तुम्ही कांदिवलीमध्ये 55-60 लाख रुपयांमध्ये घर खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला भाड्याने राहण्यासाठी 12,000 ते 15,000 हजारात घर उपलब्ध होईल.

  1. मालाड

मालाडमध्ये अनेक MNC’s आहेत. मालाड हे मुंबईत राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहरांपैकी एक मानले जाते. स्ट्रीट फूड, शॉपिंग सेंटर्स, चांगली हॉटेल्स, शाळा आणि दवाखाने सुद्धा या ठिकाणी सहज उपलब्ध आहेत. मालाड हे लिंक रोड, एसी रोड, आणि फेरींद्वारे इतर शहरांशी जोडलेले आहे. येथे तुम्हाला राहण्यासाठी किंवा भाड्याने परवडणारे घरं (Affordable Flats Mumbai) सहज मिळेल.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

  1. चेंबूर

चेंबूर हे एक मध्यवर्ती ठिकाण आहे जे मुंबई आणि मुंबईच्या अनेक उपनगरांना जोडते. येथे अनेक औद्योगिक हब असल्याने चेंबूर हा कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. याशिवाय अनेक आयटी कंपन्या, पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भाभा अणु संशोधन केंद्र, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इतर नामांकित कंपन्या सुद्धा इथे आहेत. चेंबूर हे प्रवासासाठी सोयीचे आहे कारण ते मध्य मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान जोडणारे ठिकाण आहे. चेंबूरमध्ये भाड्याने फ्लॅट घ्यायचा असल्यास त्याची किंमत साधारण 18-20 जाणार आहे.

  1. विक्रोळी

ईशान्य मुंबईतील एक सुसज्ज उपनगर म्हणून विक्रोळीची ओळख आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक चांगल्या निवासी इमारती आणि सोसायटी उपलब्ध आहेत. विक्रोळी हे मध्य रेल्वेने मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडले गेलेले आहे. सोबतच ईस्टर्न हायवे आणि एलबीएस रोड असल्याने प्रवास करणे ही सोयीच होतं.

  1. घाटकोपर

मुंबईत राहण्यासाठी अजून एक सुंदर ठिकाण म्हणजे घाटकोपर. मेट्रोने घाटकोपर ते पश्चिम मुंबई हा प्रवास करणं सहज सोपं आहे. येथे राहण्यासाठी अनेक बहुमजली इमारती आणि निवासी सोसायट्या आहेत. तुम्हाला तुमचे घर घाटकोपरमध्ये सुमारे 70 ते 80 लाख रुपयांमध्ये मिळू शकते. तसेच, हे घर 15,000 ते 20,000 हजारात भाड्याने देखील मिळेल.

मुंबईतील या महत्त्वाच्या ठिकाणांव्यतिरिक्त, पवई, कुर्ला, ऐरोली या ठिकाणी ही तुम्हाला बजेटमधे तुमचे घर घेता येऊ शकते.

Leave a Comment