काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

आता म्हाडा आपले घर खरेदी करणार्‍यांना काही खास सवलतती देणार आहे. तुम्ही मुंबईत म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाची विरार मधील जवळजवळ 10 हजार घरांपैकी 5 हजार एवढी घरे (Mhada Flats Mumbai) अजूनपर्यंत विक्रीविना तशीच पडून आहेत. आता या घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाने एक गठ्ठा घरांच्या विक्री करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. सरकारी संस्थांना किंवा व्यक्तींना ही एक गठ्ठा 100 घरे विकता आली पाहिजे म्हणून आता म्हाडाने काम सुरू केले आहे. म्हाडाची ही 100 घरे एकदाच खरेदी करणाऱ्यांना घरांच्या विक्री किमतीत 15 टक्के एवढी सवलत देण्यात येणार आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाने विरारमध्ये जवळपास 10 हजार घरे (Mhada Flats Virar) बांधली आहेत. पण यातील निम्मी घरे विकली गेली असून 5 हजार घरांची विक्री झालेली नाही. या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढूनही ही घरे विकलेली नाही. ही घरे रिकामी पडून असल्याने या घरांच्या देखभाल तसेच दुरुस्तीचा खर्च म्हाडाला करावा लागत आहे. म्हणून या घरांची विक्री व्हावी म्हणून म्हाडाचे प्रयत्न सुरू आहे.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

घरे भाड्यावर मिळणार (Mhada Flats)

सध्या राज्यभरात म्हाडाची जवळपास 11 हजार घरे विक्रीविना पडून आहेत. या घरांना ग्राहक मिळवून देण्यासाठी म्हाडाने खासगी बिल्डरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता काम सुरू झाले असून या घरांच्या विक्रीसाठी 5 पर्याय सुचविण्यात आले आहे. शंभरपेक्षा जास्त घरे खरेदी करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना किमतीत सवलत दिली जाणार आहे. तसेच मागणीनुसार घरे भाड्यावर मिळणार आहे. घर भाड्याने देण्याच्या पर्यायामध्ये बॅंका, हॉस्पिटल, खासगी कंपन्या, सरकारचे मोठे प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या कंत्राटदारांचे कर्मचारी, शासकीय-निमशासकीय संस्था तसेच सेवाभावी संस्थांना त्यांच्या मागणीनुसार घरे भाड्यावर देण्यात येणार आहे.

अरे वा! आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

1 thought on “काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!”

Leave a Comment