पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

Mhada Pune Lottery 2024 : अलीकडेच म्हाडाच्या पुणे विभागाची 2024 मधील नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जर तुम्हालाही पुण्यात स्वस्तात घर (2 BHK Flats Pune) घ्यायचं असेल तर आता तुम्हाला मोठी संधी मिळाली आहे. म्हाडाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 4882 एवढी घरे (Mhada Flats) पुणे विभागाने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे आता पुण्यात स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या या लॉटरीत फक्त 9 लाखात घर घेण्याची संधी मिळत आहे. हे स्वस्त घर कुठे आहे? आणि या घराचा कार्पेट एरिया म्हणजेच चटई क्षेत्रफळ किती आहे? याची माहिती जाणून घेऊया..

म्हाडाच्या पुणे विभागाने उपलब्ध करून दिलेल्या 4882 घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील घरे, खाजगी शासकीय भागीदारीतील घरे आणि म्हाडा गृहनिर्माण योजना (Mhada Scheme) तसेच 20% सर्वसमावेशक योजनेमधील घरांचा समावेश आहे (Mhada Flats Pune). सर्व उत्पन्न गटामधील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत वेगवेगळे क्षेत्रफळ असलेली घरे म्हाडाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

पुण्यात याठिकाणी फक्त 9 लाखात घर

पुणे म्हाडाच्या लॉटरीत सर्वात स्वस्त घर कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या लॉटरीतील सर्वात स्वस्त घर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेच्या अंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही स्वस्त घरे अल्प उत्पन्न गटासाठी असून पुण्यातील दिवे पुरंदर (सर्वे क्र.1712) याठिकाणी एकूण 17 घरे आहेत. महत्त्वाचं म्हणजे येथील घरांची अंदाजे किंमत 9 लाख 44 हजार 800 रुपये अशी आहे. तसेच या घरांचा कार्पेट एरिया 29.40 चौरस मीटर एवढा आहे. या घरांसाठी ऑनलाईन अर्ज 8 मार्च पासून सुरू झाले असून 10 एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

अजून काही घरांच्या किंमती व कार्पेट एरिया

अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) काही घरे आहेत. यातील चाकण महाळुंगे इंगळे फेस 2 (PMAY) प्रोजेक्ट मधील घरांची अंदाजे किंमत 13 लाख 61 हजार 895 रुपये अशी असून येथे 32 घरे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच येथील घरांचा कार्पेट एरिया 51.59 चौरस मीटर एवढा आहे. येवलेवाडी याठिकाणी 12 घरे विक्रीकरिता उपलब्ध असून या घरांचा कार्पेट एरिया 43.65 ते 49.49 चौ.मी. असा आहे. महत्त्वाचं म्हणजे या घरांची अंदाजे किंमत 13 लाख 94 हजार 400 ते 15 लाख 81 हजार रुपये यादरम्यान आहेत. जर तुम्ही घरांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर म्हाडाच्या www.mhada.gov.in किंवा lottery.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

खुशखबर! म्हाडाची घरे झाली स्वस्त; आता या किंमतीत मिळणार म्हाडाचे घर, येथे क्लिक करून पहा बातमी..!

2 thoughts on “पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!”

Leave a Comment