नवी मुंबई वेगाने विकसित होत असल्याने नवी मुंबईत घर (2 BHK Flats Navi Mumbai) घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सामान्य माणसालाही घर घेता यावे म्हणून सिडकोकडून गृह योजना आणण्यात आली आहे. तसेच सामान्यांना नवी मुंबईत दुकानेही खरेदी करता यावी म्हणून 243 दुकानांची योजना सिडकोने बुधवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईत सामान्यांना सिडकोकडून स्वस्तात दुकान खरेदी करता येणार आहे. नवी मुंबईत या दुकानांचे लोकेशन कुठे आहे? आणि या दुकानांसाठी ऑनलाइन नोंदणी कधी सुरू होणार? याची माहिती आपण जाणून घेऊया..
नवी मुंबईत या लोकेशनवर सिडकोची दुकाने
उलवे मधील बामणडोंगरी परिसरातील महागृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेली 243 दुकानांच्या विक्रीसाठी सिडको महामंडळाकडून बुधवारी योजना जाहीर करण्यात आली आहे. या दुकानांची विक्री ई-लिलाव प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. या दुकानांसाठी ऑनलाइन नोंदणी 14 मार्च ते 13 एप्रिल यादरम्यान करता येणार आहे (Cidco Navi Mumbai).
पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!
सिडकोच्या या दुकानांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता
पुढील वर्षभरात सुरू होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, उरण नेरुळ मध्यरेल्वेचे मुख्य स्थानक तसेच दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असल्यामुळे उलवे नोड या वसाहतीची चर्चा होताना दिसते. विशेष म्हणजे सिडकोकडून याच परिसरात राज्यातील पहिला एकता मॉल उभारण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सिडकोच्या या दुकानांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..
सिडकोच्या या योजनेमूळे उलवे परिसरात व्यवसाय करण्याची संधी व्यावसायिकांना मिळाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मध्यम तसेच लहान व्यावसायिकांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील सिडकोकडून करण्यात आले आहे. उलवेतील या दुकानांसाठी इच्छुक असणार्यांनी सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com/ या संकेतस्थळला भेट द्यावी..