मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, पहा बातमी..!

Affordable Flats Mumbai : सध्या मुंबई आणि मुंबई जवळील भागात घरांची मोठी मागणी वाढली आहे. आता लोक भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा हक्काच्या घरात राहणे पसंत करतात. त्यामूळे परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats) कुठे मिळणार याचा शोध घेतला जातो. मुंबईत स्वस्तात घर घेण्यासाठी सामान्य लोकांना म्हाडा लॉटरी (Mhada Lottery) आणि सिडको लॉटरीची मोठी मदत होते. मुंबई किंवा मुंबईजवळील काही भागात स्वस्तात घरे उपलब्ध आहेत. आता तुम्हालाही मुंबईजवळील भागात फक्त 13 लाखात घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या घरांची किंमत 13 लाखांपासून ते 28 लाखांपर्यंत आहे.

मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..

याठिकाणी 13 लाखात घर

ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेेकडून मालमत्तेचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात ग्राहकांना परवडणारी घरे, मध्यमवर्गीय घरे आणि उच्च वर्गीय घरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुंबई, बदलापूर, नेरळ या भागातील घरे आणि नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) परिसरामध्ये बंगलो प्लाॅटचे पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रदर्शनामध्ये ठाणे शहरामधील शंभरपेक्षा जास्त गृहप्रकल्पातील घरे विक्रीकरिता ठेवली आहेत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील (Badlapur, Thane) घरांच्या किंमती 13 लाख ते 28 लाखांपर्यंत आहेत.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

यात 50 पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांनी आणि 15 पेक्षा जास्त बँकांनी सहभाग नोंदवला आहेत. विशेष म्हणजे प्रदर्शनामध्ये नागरिकांना विनामुल्य प्रवेश देण्यात येत आहे. हे मालमत्ता प्रदर्शन ठाण्यात पोखरण रोड क्रमांक 1 वर असलेल्या रेमंड कंपनीच्या मैदानामध्ये भरविण्यात आले असून हे मालमत्ता प्रदर्शन 19 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7.30 यादरम्यान सुरू राहणार आहे.

खुशखबर! मुंबईत म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी नवीन 86 घरे, येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती..

या मालमत्ता प्रदर्शनात परवडणारी, मध्यमवर्गीय तसेच उच्च वर्गीय या प्रकाराची घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. ठाणे (Thane) आणि घोडबंदर या भागामध्ये 300 चौरस फुटापासून ते त्यापेक्षा जास्त चौरसफुटाच्या घरांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. आणि या घरांच्या किंमती 40 लाख ते 4 कोटी रुपये या दरम्यान आहेत.

3 thoughts on “मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, पहा बातमी..!”

Leave a Comment