Home Loan Tips : बरेच लोक स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहतात. घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्यासाठी अर्ज करण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण होम लोन परतफेड करण्याचा कालावधी दीर्घ असतो आणि त्या कालावधीत कर्जाची परतफेड केली गेली पाहिजे. हा दीर्घ कालावधी असल्याने यासाठी खूप विचार करून निर्णय घ्यावे लागतील. बँकांसह अनेक वित्तीय संस्थांसाठी सुद्धा ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा असतो. त्यामुळे, तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला अधिक आणि स्वस्त कर्ज मिळविण्यात सहाय्य करतो.
जॉइंट गृहकर्ज घ्या (Joint Home Loan)
बँका किंवा फायनान्स कंपन्या या कर्जावर व्याज देखील आकारतात आणि ठराविक कालावधीसाठी दर महिन्याला ठराविक रकमेचे हप्ते भरून हे कर्ज फेडता येते. विशेष म्हणजे तुम्ही कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड करेपर्यंत तुमचे घर तुम्ही ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून घेतले आहे त्या बँकेकडे गहाणच राहील. कर्जासाठी अर्ज करताना तुम्ही तुमच्यासोबत सह-अर्जदार जोडल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत बँक कर्ज देताना तुमच्या सह-अर्जदाराचे उत्पन्नही विचारात घेते. एकत्र अर्ज केल्यामुळे तुमची पात्रता वाढण्याची शक्यता जास्त असते.
जॉइंट होम लोन हे दोन्ही अर्जदारांना कर कपातीचा लाभ प्रदान करते. याशिवाय कर्जासाठी महिला अर्जदार असल्यास काही बँका होम लोनच्या इंटरेस्ट रेट मधेही लाभ देतात. जॉइंट होम लोन एका व्यक्तीसाठी EMI चे ओझे देखील कमी करू शकते. मात्र होम लोन साठी अर्ज करण्यापूर्वी, बँक कोणत्या व्याज दराने कर्ज देते याचा विचार करणे आवश्यक आहे. व्याज दर बँकेनुसार वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक बँक किंवा वित्तीय संस्थेच्या व्याजदरांमध्ये आणखी काही फरक असू शकतात. याव्यतिरिक्त, दीर्घ मुदतीचे कर्ज तुमचे पैसे वाचवू शकते किंवा तुम्हाला अधिक पैसेही भरावे लागू शकतात.
काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!
कर्ज घेताना या गोष्टी तपासून घ्या
होम लोनशी संबंधित असणारे बँकेचे कागदपत्र वाचणे हे एक अत्यंत अवघड असते, कारण यामधे काही तांत्रिक अटींचा समावेश केलेला असल्याने ते समजण्यास खूप अवघड असते. तरीही, तुम्हाला ते वाचावे लागेल आणि शक्य तितके समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे समजून घेण्यासाठी तुम्ही आर्थिक किंवा कर्जाबाबत माहिती देणाऱ्या साइट्सची मदत सुद्धा घेऊ शकता. कागदपत्रांवरील बारीक अक्षरामधे लिहिलेल्या गोष्टी या काळजीपूर्वक वाचण्याचा प्रयत्न करा. सोबतच ईएमआय पेमेंटशी संबंधित अटी आणि नियम वाचणे आणि समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.
कर्जासाठी अर्ज करताना, तुम्हाला घराच्या किमतीच्या काही भागाचे डाउन पेमेंट देखील करावे लागेल. तुम्ही जितके अधिक डाउन पेमेंट कराल तितका तुमचा भार कमी होईल. काही बँका कर्जाची मुदत 30 वर्षे ठेवतात. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने ठरवलेल्या रेपो दराच्या आधारे बँका कर्जदरात कमी जास्त वाढ करत असतात.
मोठी बातमी! आता म्हाडा घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी नक्की वाचा..