मोठी बातमी! आता म्हाडा घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी नक्की वाचा..

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांकडून प्रतेक लॉटरीत सर्वसामान्यांसह उच्च उत्पन्न गटाला सुद्धा परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर (Affordable Mhada Flats) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता इथून पुढे म्हाडाच्या लॉटरीत (Mhada Lottery) उच्च गटातील महागड्या घरांचा समावेश केला जाणार नसल्याची शक्यता आहे. आता पुढील काळात उच्च गटासाठी घरांची निर्मिती न करण्याचा विचार म्हाडाने सुरू केला आहे. पण असा निर्णय का घेतल्या जाऊ शकतो? चला जाणून घेऊया यामागील कारण..

या कारणामुळे उच्च गटातील महागड्या घरांची निर्मिती थांबण्याची शक्यता

उच्च गटाच्या महागड्या घरांना मागणी नसल्यामूळे आणि अत्यल्प व अल्प गट प्राधान्यक्रम असल्याने म्हाडाकडून असा विचार सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा निर्णय झाल्यास उच्च गटातील महागडी घरे म्हाडाच्या लॉटरीत येणार नाही. अत्यल्प आणि अल्प गटाच्या गृहनिर्मितीसाठी येणारा खर्च भरून काढण्याकरिता म्हाडाकडून मध्यम आणि उच्च गटातील घरांची निर्मिती करण्यात येते.

म्हाडाच्या धोरणानुसार म्हाडाला अल्प आणि अत्यल्प गटाच्या घरांच्या विक्रीतून काहीच नफा मिळत नाही. पण मध्यम आणि उच्च गटातील जी घरे आहेत त्यांच्या विक्रीतून म्हाडाला नफा मिळतो. मध्यम गटाच्या घर विक्रीतून 5 ते 15 टक्के आणि उच्च गटातील घर विक्रीतून 15 ते 35 टक्के एवढा नफा म्हाडाला मिळत असतो. हा नफा मिळवण्यासाठी म्हाडा (Mhada) मध्यम आणि उच्च गटातील घरांची निर्मिती करत असते.

काय सांगता! मुंबईत म्हाडाची घरे भाड्याने मिळणार; येथे क्लिक करून पहा म्हाडा कोणत्या सवलती देणार..!

नेहमीच म्हाडाकडून लॉटरीत उच्च गटातील घरांचा समावेश करण्यात येतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये उच्च गटातील घरांची विक्री होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हाडाची ही घरे महागडी असल्यामुळे ग्राहक या घरांना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ही घरे रिक्त पडून असल्याने यातून म्हाडाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

उच्च गटातील ग्राहकांना खासगी विकासकांचा पर्याय उपलब्ध असल्याने हे ग्राहक म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवत आहे. या पार्श्वभूमीवर आता म्हाडाकडून उच्च गटाच्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार सुरू सुरू असल्याची माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

फक्त एवढे पैसे भरा आणि पुण्यात म्हाडाचा फ्लॅट घ्या; फक्त येथे करा एक कॉल..!

Leave a Comment