बाप रे! मुंबईतील सर्वात महागडी घरं; किंमती पाहून उडतील हौश..!

Expensive House in Mumbai : मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि देशातील सर्वात जास्त पैसा याच आर्थिक राजधानीत आहे. मुंबईत देशातील तसेच विदेशातील मोठ मोठे उद्योगपती राहतात. सर्व प्रकारचे उद्योग-व्यवसाय असलेल्या मुंबईत देशातील सर्वच भागातून लोक नौकरीसाठी येतात. इथली प्रतेक गोष्ट विशेष असते. मुंबईत सर्वात महागडी घरे (Expensive House in Mumbai) आहे ज्यांची किंमत ऐकल्या नंतर आपले नक्कीच हौश उडतील.

सध्या मुंबईत सर्वात महागडं घर देशातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं आहे. हे घर मुंबईत असून अंबानी यांच्या या निवासस्थानाचं नाव एंटीलिया असं आहे. फोर्ब्सकडून मिळालेल्या माहितीनुसार एंटीलियाची किंमत अंदाजे एक बिलियन डॉलर एवढी आहे. देश नाही तर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी हे एक घर आहे. मुकेश अंबानी यांच्या एंटीलिया या घरात 27 मजले असून यात 9 हाय स्पिड लिफ्ट देण्यात आल्या आहेत. या घरामध्ये 168 कार राहू शकतील एवढी मोठी पार्किंग आहे. तसेच 3 हेलीपॅड, एक  भव्य बॉलरुम आणि एक थिएटर तसेच स्पासुद्धा आहे. 

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

त्यानंतर मुंबईत जाटिया हाऊस देखील महागड्या घरांच्या यादीत आहे. मलबार हिल येथे असलेल्या या घरात आदित्या बिरला समूहाची चौथी पिढी कुमार मंगलम बिरला राहातात. हे घर खूप मोठं आहे, जवळपास 28 हजार चौर मीटरमध्ये हे घर पसरलं आहे. या बंगल्याची किंमत खूपच जास्त आहे, अंदाजे 425 कोटी एवढी या घराची किंमत आहे.

अर्ध्या किंमतीत मिळणार म्हाडाचं सर्वात मोठं घर; डोंबिवलीत घर उपलब्ध, पहा बातमी..

महागड्या घरांच्या यादीत मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल हे देखील आहेत. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे देखील अलिशान बंगल्यात राहातात. पिरामल कुटुंबाने हा बंगला 2012 मध्ये 452 कोटी रुपयांना विकत घेतलेला आहे. गुलिटा असं या बंगल्याचं नाव आहे. या बंगल्यामध्ये 5 मजले असून 3 बेसमेंट आहेत. 

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

मुंबई मधील 78 भूलाभाई देसाई या रोडवरती असलेले लिंकन हाऊस हे सायर पूनावाला यांचं घर आहे. विशेष म्हणजे या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे घर वांकानेरचे महाराजा एचएच सर अमरसिंह बनसिंहजी आणि त्यांचे पूत्र प्रतातपसिंहजी यांच्याकरिता बनवण्यात आला होता. आणि हे घर 2015 मध्ये सायरस पुनावाला यांनी 113 मिलियन डॉलरमध्ये विकत घेतला.

बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचा मुंबईमधील मन्नत बंगल्याचं चाहत्यांना नेहमीच आकर्षण असते. मुंबईमधील बँडस्टँड परिसरामध्ये असलेला या बंगल्याची किंमत जवळपास 200 कोटी रुपये एवढी आहे. हा बंगला सहा मजल्यांचा असून याला मोठी गॅलरी देण्यात आली आहे. तसेच यात एक थिएटरदेखील आहे. 

बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग..पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा मुंबईमधील कुलाबा याठिकाणी अलिशान घर (Luxury House Mumbai) आहे. रतन टाटा यांच्या बंगल्याची किंमत जवळपास 150 कोटी रुपये एवढी असून या बंगल्याचं क्षेत्रफळ जवळपास 13,350 चौरस मीटर एवढं आहे. 

Leave a Comment