Mhada Flats : म्हाडा कोकण मंडळाच्या (Mhada Konkan Lottery) 5 हजार 311 घरांसाठी नोव्हेंबर महिन्यात सोडत काढली जाणार असून यासाठी सध्या अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत 5311 एवढ्या घरांसाठी अनामत रक्कमेसह फक्त 1026 एवढेच अर्ज सादर झाले आहेत. यंदाच मे महिन्यात झालेल्या सोडतीमध्ये 4654 म्हाडाच्या घरांना (Mhada Flats) अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यामूळे अर्ध्याहून जास्त घरे विक्रीविना तसेच पडून आहेत. परिणामी, या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष लागून आहे.
कोकण मंडळाच्या घरांना नेहमीच मागणी चांगली असते. या अगोदर काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे आणि वसई-विरार मधील घरांना खूपच मागणी असल्याचे निदर्शनास आले होते. असे असताना मात्र मे मध्ये झालेल्या सोडतीत 4654 घरांना खूप कमी प्रतिसाद मिळाला होता. दोन हजारांपेक्षा जास्त घरे विकली गेली नव्हती. त्यामुळेच कोकण मंडळाकडून मे मध्ये झालेल्या सोडतीनंतर घाईघाईने पुन्हा नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
काय सांगता! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, येथे क्लिक करून पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!
कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये पंतप्रधान आवास योजनेमधील आणि प्रथम प्राधान्य योजनेमधील घरांना कमी प्रतिसाद मिळत आहे. पीएमएवाय योजनेमधील घरे काही प्रमाणात महाग असून शहरांपासून थोडी दूर असल्याने या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. विरार-बोळींजमधील गृहप्रकल्पामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर असून कदाचित यामुळे देखील या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. विरार-बोळींजमध्ये आता लवकरच सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील सोडतीमध्ये समाविष्ट असलेली ही घरे विकली जाणार असा विश्वास कोकण मंडळाला आहे. पीएमएवाय योजनेकरिता वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकतील. परिणामी, या घरांना देखील चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
येत्या 3 नोव्हेंबर या दिवशी पात्र असलेल्या अर्जांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होऊन एक आठवडा उलटला असून या कालावधीमध्ये खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. मंडळाद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत 5311 एवढ्या घरांसाठी 2791 इच्छुकांनी अर्ज भरलेले आहे. यातून फक्त 1026 एवढ्या जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज भरले आहेत.
काय सांगता! महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..
म्हाडाच्या या घरांना जास्त मागणी (Mhada Flats)
खासगी विकासकांच्या घरांना जास्त मागणी : कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये 2021 या वर्षीपासून 20 टक्के योजनेमधील घरांचा समावेश करण्यात येत आहे. खासगी विकासकांच्या गृहप्रकल्पामधील घरे म्हाडाच्या सोडतीच्या माध्यमातून कमी किमतीमध्ये (Affordable Mhada Flats) उपलब्ध होत असल्याने या घरांना मोठी मागणी आहे. 2021 मध्ये 20 टक्के योजनेमधील 812 घरांसाठी 2 लाखांपेक्षा जास्त अर्ज सादर झाले होते. आणि मे महिन्यात झालेल्या सोडतीत देखील 20 टक्क्यांमधील घरांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि ही घरे मोठ्या प्रमाणात विकली गेली. आता अशी स्थिती नोव्हेंबर मधील सोडतीत असेल अशी अपेक्षा लागून आहे. आतापर्यंत घरांसाठी दाखल झालेल्या 1026 अर्जांपैकी सर्वात जास्त 725 एवढे अर्ज 20 टक्के योजनेमधील घरांसाठी आहेत.