खुशखबर! नऊ लाखांच्या होम लोनवर मिळणार व्याज सब्सिडी, पहा कोण आणि कधी घेऊ शकता लाभ..

Home Loan Subsidy Scheme : आता छोट्या शहरात असो की मुंबई सारख्या मोठ्या शहरात घर (Flat in Mumbai) घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता केंद्र सरकार छोट्या कुटुंबासाठी होम लोन सब्सिडी योजना (Housing Loan Subsidy Yojana) सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 25 लाख लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्याची सबसिडी किती असणार हे मात्र अजून ठरलेले नाही, कारण सबसिडीची रक्कम घरच्यांच्या मागणीवर अवलंबून असणार आहे. चला तर मग योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार का? याची माहिती आपण जाणून घेऊया..

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या योजनेअंतर्गत मोदी सरकार पाच वर्षांमध्ये जवळपास 60,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. या अंतर्गत 25 लाख एवढ्या होम लोन अर्जदारांना लाभ दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही योजना काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. पण अजून पर्यंत त्याची तारीख निश्चित झालेली नाही.

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, येथे क्लिक करून पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!

कोणाला मिळणार लाभ?

स्वतंत्रता दिवस 2023 च्या भाषणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ने घोषणा केली होती की सरकार एका नवीन योजनेच्या माध्यमातून शहरांत भाडेतत्त्वावर राहणार्‍या लोकांना स्वस्तात होम लोन (Cheapest Home Loan) उपलब्ध करून देणार. पंतप्रधान म्हणाले होते की या योजनेमुळे भाड्याने, झोपडपट्टीत आणि अनधिकृत कॉलन्यांमध्ये राहणार्‍या लोकांना लाभ मिळेल.

महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

किती लोन अमाउंट आणि व्याज सब्सिडी

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, या नव्या योजनेच्या माध्यमातून 9 लाख रुपयांपर्यंत लोन अमाउंट दिली जाऊ शकते. आणि यावर 3 किंवा 6.5 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज सब्सिडी दिली जाऊ शकते.

पात्रता काय असावी?

या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि ही सब्सिडी 20 वर्षांच्या कालावधीसाठी 50 लाख रुपयांपेक्षा कमी होम लोन वर उपलब्ध होऊ शकते. व्याजावर मिळालेली सूट लाभार्थीच्या होम लोन अकाऊंटमध्ये जमा होऊ शकते. लवकरच याला कॅबिनेटकडून मंजूरी मिळू शकते.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment