खुशखबर! आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी या तारखेपर्यंत करू शकता अर्ज, स्वस्तात घर घेण्याची पुन्हा संधी..!

Affordable Mhada Flats : म्हाडाच्या माध्यमातून शहरी भागात राहणार्‍या लोकांना स्वस्तात घर मिळत असल्याने अनेक लोक म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत आहे. म्हाडाच्या माध्यमातून मुंबई सारख्या मोठ्या शहरात अवघ्या 11 लाखात फ्लॅट (1 bhk flat Mumbai) उपलब्ध झाले आहे. पुण्यात देखील जवळपास 6 हजार घरे उपलब्ध झाली आहे. परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे (Affordable Mhada Flats) मिळत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात अर्ज करतात. अलीकडेच म्हाडाच्या पुणे विभागाकडून काढलेल्या जवळपास 6 हजार घरांच्या सोडतीला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.

म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे खूपच महत्वाची असतात. त्याच पद्धतीने म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Flats) देखील अर्जदारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. त्यामुळे अर्जदारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करत असताना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन ही मुदत आता 20 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि या सोडतीचा लकी ड्रॉ 9 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.

काय सांगता! मुंबईत म्हाडाचे घर फक्त एवढ्या लाखात, येथे क्लिक करून पहा किंमती आणि अर्ज प्रक्रिया..!

म्हाडाच्या पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये जवळपास 5 हजार 863 एवढ्या सदनिकांच्या सोडतीकरिता 6 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारपर्यंत म्हणजेच 27 तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. आणि अनामत रक्कम भरण्याची 28 सप्टेंबर पर्यंत मुदत होती. तसेच ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची मुदत 29 सप्टेंबर होती.

महिलांना पुरुषांपेक्षा मिळते खूपच स्वस्त होम लोन, येथे क्लिक करून पहा बातमी..

पण आता अर्जदारांना अर्जासोबतच रहिवासाचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आल्यामूळे परिपूर्ण असलेले अर्जच स्वीकारण्यात येत होते. या महिन्यामध्ये असलेल्या सुट्यांमुळे बर्‍याच अर्जदारांना रहिवासाचा दाखला संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून वेळेवर मिळत नव्हता. त्यामुळे अर्जदार तसेच बर्‍याच संस्था संघटनांकडून ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी म्हाडाकडे करण्यात आली होती.

त्यामुळे आता ही मुदत 20 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे. आणि अनामत रक्कम भरण्यासाठी 21 ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीतील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाईटवर 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. आजपर्यंत (27 सप्टेंबर) या सोडतीसाठी सायंकाळपर्यंत 32 हजार 996 जणांनी अर्ज केले होते.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

Leave a Comment