Cheap Home Loan : गेल्या काही वर्षांमध्ये देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे आता देशाच्या प्रगतीचा भाग बनलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये देखील बदल झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्ता (Property) खरेदी करणार्या महिलांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. रिअल इस्टेट ट्रेंडमधील हे बदलते वातावरण बँकबाझारद्वारा ठळक करण्यात आले आहे. त्यातून पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे जास्त घरे असल्याचं समोर आलं आहे.
महिला कर्जदारांना होम लोनच्या संबंधात प्राथमिक किंवा सह-अर्जदार म्हणून अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया होम लोन (Home Loan) घेणार्या महिलांना कोणते फायदे मिळू शकतात.
म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!
महिलांना कमी व्याज दरात होम लोन (Home Loan)
महिलांना घराचे मालक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, अनेक बँका आणि NBFC परवडणाऱ्या व्याजदरावर लोन (Affordable interest rates Loan) देतात. महिला कर्जदारांना दिले जाणारे व्याजदर सामान्यत: नियमित कर्जदारांपेक्षा 0.05 ते 0.1 टक्के एवढे कमी असतात. ऑफर केलेले सर्वोत्तम दर बॅंकांनुसार बदलू शकतात आणि सामान्यतः अर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर देखील आधारित असतात.
ही ट्रिक कधी ऐकली नसेल; महिन्याभरातच लाईट बिल येईल अर्धे.. येथे क्लिक करून पहा ही नवीन ट्रिक..
महिलांनी घेतलेल्या होम लोनवर (Home Loan) कमी व्याज आकारणाऱ्या काही मोठ्या बँका आणि त्यांचा व्याजदर
युनियन बँक
नियमित व्याजदर – 9.20-9.55
महिला अर्जदार – 9.15-9.50
बँक ऑफ इंडिया
नियमित व्याज दर – 10.60-10.75
महिला अर्जदार – 10.55-10.70
सेंट्रल बँक
नियमित व्याज दर – 8.50-9.50
महिला अर्जदार – ८.३५-९.२५
कॅनरा बँक
नियमित व्याज दर – 8.60-11.25
महिला अर्जदार – 8.55-11.20
आता पुन्हा एकदा मोठी संधी! स्वस्तात घ्या घर; स्वस्तात मिळणार्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा..
कमी मुद्रांक शुल्क
आपल्या देशात मालमत्तेच्या (Property) विक्रीवर किंवा खरेदीवर मुद्रांक शुल्क आकारले जाते. याला सहसा टक्केवारीच्या रुपात मोजले जाते जे मालमत्तेच्या किमतीच्या 3% ते 9% किंवा त्याहून अधिक असते. पण हे शुल्क भारतातील राज्यानुसार बदलते आणि बरेच राज्ये घरे खरेदी करणाऱ्या महिलांना मुद्रांक शुल्कात सूट देतात.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क पुरुषांसाठी 6% आकारला जातो तर महिलांसाठी 5% आहे. पंजाबमध्ये घरे खरेदी करणाऱ्या पुरुषांसाठी 7% तर महिलांसाठी 5% इतके कमी मुद्रांक शुल्क आकारले जाते. हरियाणा, राजस्थान, ओडिशा आणि उत्तराखंड या सारख्या इतर अनेक राज्यांमध्ये महिलांकडून कमी मुद्रांक शुल्क आकारले जाते.
घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा, भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून पहा बातमी..
व्याज दर अनुदान (Interest Subsidy)
जास्तीत जास्त महिला घरमालक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, भारत सरकारकडून अनेक योजना जाहीर केल्या आहेत. ज्यात व्याज अनुदानाचाही (Interest Subsidy) समावेश आहे. योजनांपैकी एक म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PMAYU), यात महिलांना घराचा मालक किंवा सह-मालक असणे आवश्यक आहे. अशा महिलांसाठी कमाल रु. 2.67 लाख एवढे व्याज अनुदान दिले जाते. याशिवाय, आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EWS) किंवा कमी उत्पन्न गट (LIG) मधील एकल किंवा विधवा महिला कर्जदार 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 6.5% सबसिडीसाठी पात्र आहेत.
2.67 Lakh Ruppy PMAYU (Interest Subsidy)