घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा, भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा..!

Real Estate Investment : रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हे नेहमीच एक फायद्याचे काम समजले जाते. घर, जमीन अशा प्रकारच्या मालमत्ता तुमच्या गुंतवणुकीतून जास्त पैसा तुम्हाला मिळून देतात. तसेच पैशांची गुंतवणूक (Real Estate Investment) करण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे हा सुरक्षित पर्याय मानला जातो. म्हणूनच ज्या लोकांकडे जास्तीचा पैसा पडलेला असतो ती लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. कारण दिवसेंदिवस प्लॉट, घर, जमीन यांचे भाव वाढत असल्याने पुढील काळात त्यातून जास्तीचा पैसा मिळण्याची दाट शक्यता असते.

अलीकडे बरीच लोक घर खरेदी करतात. त्यामूळे घर खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. असे न झाल्यास अनेक लोकांना घर विकत घेतल्यानंतर पश्चाताप करावा लागतो. आज या बातमीत आपण अशा 3 गोष्टी पाहणार आहोत, ज्या घर विकत घेत असताना पाहणे महत्वाचे आहे.

घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा (Housing Investment)

(1) ठिकाण : तुम्ही रिअल इस्टेट मालमत्तेत गुंतवणूक करत असाल तर ती कुठे आहे? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्याच्या आजूबाजूचं जागेवर काय आहे? आणि तिथले वातावरण कसे आहे? हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. त्यामुळे घर किंवा प्लॉट विकत घेताना ठिकाण कसे आहे हे सर्वात अगोदर जाणून घ्यावे.

घर विकत घेणे हा एक खूप महागडा सौदा असतो, त्यामूळे एखादी मागासलेली जागा असेल किंवा कमी विकसित भाग असेल तर ठिकाणी एवढी मोठी रक्कम गुंतवणे अजिबात योग्य नसते. कारण भविष्यात त्याठिकाणी तुम्हाला चांगली रक्कम मिळेलच याची खात्री नसते. तर दुसरीकडे जर ठिकाण चांगले असेल तर भविष्यात घेतलेल्या जागेचा किंवा घराचा दुप्पट पैसा मिळू शकतो. म्हणून घर घेत असताना ठिकाण कसे आहे हे नक्की तपासावे..

येथे वाचा – संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..

(2) कनेक्टिव्हिटी : मालमत्तेचं मूल्य तसेच गुंतवणुकीवर किती परतावा (ROI) मिळतो हे तेथील कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असते. कनेक्टिव्हिटीमुळे घराच्या किमतीत मोठा चढ-उतार घडून येतो. आपल्या घरापासून विमानतळ, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि मेट्रो यांच्या सोबत चांगली कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे. म्हणजे घरापासून याठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता असणे गरजेचा आहे. त्यामुळे घरांच्या किंमती भविष्यात वाढण्याची शक्यता असते.

(3) चांगल्या सुविधा : तुम्ही ज्या ठिकाणी घर किंवा फ्लॅट घेत असाल तर त्या ठिकाणी चांगल्या सुविधा उपलब्ध आहे का? हे तपासून घ्यावे. गाड्यांसाठी पार्किंग, प्ले ग्राऊंड, व्यायामशाळा, चांगले रस्ते या सुविधा जर असतील तर भविष्यात तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते. तसेच तुमची मालमत्ता कोणीही चांगली रक्कम देऊन भाड्याने घेऊ शकतो.

येथे वाचा – खुशखबर! मुंबईत मिळणार फक्त 18 लाखात घर; महा हाऊसिंगची 17,000 घरे; पहा कोणत्या भागात मिळणार घरे..!

Leave a Comment