MHADA Lottery 2023 : म्हाडाने अलीकडे घरांसाठी अनेक लॉटऱ्या काढल्या आहेत. आणि विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देखील तब्बल 10 हजार घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता आहे. साडेचार वर्षांचा कालावधी पार पडल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा म्हाडा लॉटरीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे म्हाडाच्या या घरांना यंदा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाने यंदा नोंदणीच्या प्रक्रिये सोबतच बाकीची प्रक्रिया ही मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवले आहे (MHADA lottery 2023). त्यासाठी संगणकीय प्रणालीचा अवलंब केला जात आहे. म्हाडाने त्यांच्या नियमांमध्ये बदल सुद्धा केले आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना संपूर्ण माहिती अगदी अचूकपणे भरत आली पाहिजे.
म्हाडा या सोबतच इतर कोणत्याही शासकीय योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला एक घर दिले जाईल. नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करत असताना आपण आतापर्यंत म्हाडा किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे का? यासंबंधीत विचारपूस केली जाईल. त्यामध्ये जर नाही असे नमूद केले असेल तरच तुम्हाला पुढील अर्ज करता येईल (MHADA Lottery registration mumbai). महत्त्वाचा भाग म्हणजे लाभार्थी असलेल्या नागरिकांनी नाही असे नमूद करून अर्ज केला असेल तर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पॅन कार्ड चा आधार घेऊन इतर कोणतेही घर घेतले आहे का? याचा शोध घेतला जातो.
येथे वाचा – संधीचं सोनं करण्याची वेळ! नवी मुंबईतील या भागात प्रॉपर्टीचे भाव दुप्पट होणार; येथे क्लिक करून पहा बातमी..
दरम्यान आतापर्यंतच्या नागरिकांनी म्हाडाच्या सोडतीमध्ये भाग घेतला आहे आणि लाभार्थी झाले आहेत. त्यांचे संगणकीय प्रणालीमध्ये संपूर्ण माहिती समाविष्ट होणार आहे. त्यामुळे म्हाडा विभागाकडे याचे पूर्ण रेकॉर्डर राहील. यामुळे म्हाडाच्या आतापर्यंतच्या सोडतीमध्ये लाभार्थी नागरिकांचा शोध घेणे म्हाडाला सोपे जाईल (mhada lottery online application). म्हाडा किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेत असतानाही आगामी सोडती मध्ये सहभागी होऊन जर घराचे लाभार्थी ठरले असतील तर सोडतीमध्ये लागलेल्या घराचे वितरण पूर्णपणे रद्द होईल. अशावेळी कायद्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद सुद्धा केली आहे.