1972 पेक्षा भयानक दुष्काळी परिस्थिती उद्भवणार? केव्हा पडणार पाऊस ? हवामान विभागाने दिली मोठी माहिती

पुणे : मोसमी पावसाच्या प्रभाव क्षेत्रात, प्रामुख्याने मध्य भारतात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात दहा दिवसांचा खंड पडला आहे, त्यात आणखी तीन दिवसांची भर पडून एकूण १३ दिवसांचा खंड पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १९७२ मध्ये १८ जुलै ते तीन ऑगस्ट सुमारे १७ दिवस, तर २००२ च्या जुलै महिन्यांत सलग २४ दिवसांचा खंड पडला होता. त्यानंतर आता सलग १३ दिवस खंड पडण्याची शक्यता दरम्यान, उद्यापासून (१८ ऑगस्ट) कोकण आणि विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील मोसमी पावसाच्या प्रभाव क्षेत्रात, प्रामुख्याने मध्य भारतात साधारणपणे सहा ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत मोसमी पावसात खंड पडला आहे. त्यात आणखी दोन किंवा तीन दिवसांची भर पडून यंदाच्या ऑगस्ट महिन्यात मोसमी पावसात एकूण १३ दिवसांचा खंड पडू शकतो. १९७२ मध्ये १८ जुलै ते तीन ऑगस्ट सुमारे १७ दिवस पावसात खंड पडला होता, तर २००२च्या जुलै महिन्यांत २४ दिवसांचा खंड मोसमी पावसात पडला होता. मोसमी पावसाच्या हंगामात प्रभाव क्षेत्रात सलग तीन दिवस पाऊस न पडल्यास पावसात खंड पडली, असे मानले जाते. दरवर्षी सामान्यपणे ऑगस्ट महिन्यात मोसमी पावसात कमी-जास्त प्रमाणात खंड पडलेला दिसून येतो, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

येथे वाचा – शेतकऱ्यांना कर्जमाफी; शेतकरी सन्मान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी जाहीर, येथे क्लिक करून पहा..

दरम्यान, गेल्या २४ तासांत विदर्भात नागपूर, वाशिम वगळता पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. मराठवाड्यात बीड, परभणी आणि नदिडमध्ये हलका पाऊस झाला आहे. किनारपट्टीवरही तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात नगरमध्ये ११.२, महाबळेश्वरात १२.७ आणि सोलापुरात १.९ मिमी पावसाची नोंद

झाली आहे. मोसमी पावसाचा आस हिमालयाच्या पायथ्याशी आहे, पुढील ७२ तासांत तो दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. १८ ऑगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या पोषक स्थितीमुळे पुढील दोन, तीन दिवसांत राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १७ ऑगस्टनंतर कोकण, विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वाचा : खुशखबर! म्हाडाकडून घरांसाठी पुन्हा लॉटरी; आता स्वस्तात उपलब्ध होणार एवढी घरे, पहा बातमी..!

Leave a Comment