खुशखबर! आता म्हाडाची घरे 15 टक्के सवलतीत मिळणार; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, पहा कुठे मिळणार ही घरे?

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीची जाहिरात आल्यापासून ते सोडत जाहीर होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेच्या काळात हक्काचं घरं घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. कारण म्हाडाकडून सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात घरं उपलब्ध करून देण्यात येतात. म्हाडा नेहमीच सर्व सामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणि सवलती घेऊन येते. त्यामुळे मुंबईत हक्काचे घर (2 BHK Flats Mumbai) घेण्याचे सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण होते. आता म्हाडाने स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी एक चांगली सवलत आणली आहे. आता तब्बल 15 टक्के सवलतीसह म्हाडाचे घर (Mhada Flats) घेता येणार आहे. म्हाडाची ही घरे नेमकी कुठे आहेत? आणि म्हाडाच्या या 15 टक्के सवलतीबाबत अधिक माहिती जाणून घेऊया..

म्हाडाने आता आपल्या तयार घरांची विक्री करण्यासाठी एकगठ्ठा घरांच्या विक्रीचा पर्याय अवलंबल्याचं चित्र असून त्याकरिता आता निवीदा देखील जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यानुसार आता म्हाडाच्या घरांच्या विक्री दरात तब्बल 15 टक्क्यांनी सवलत देण्यात येणार आहे. पण ही सवलत एका वेळी 100 घरे खरेदी करणार्‍यांना मिळणार आहे.

अरे वा! आता मुंबईत सरकारी योजनेतून मिळवा प्लॉट; येथे क्लिक करून पहा किंमती आणि लोकेशन..!

याठिकाणी मिळणार 15 टक्के सवलतीत म्हाडाची घरे

म्हाडाने गृहप्रकल्प योजनेमधून विरार-बोळींज याठिकाणी 10 हजार घरांच्या प्रकल्पाची निर्मिती केली.
पण प्रकल्पामधील काही घरं विकली गेली तर अजूनही 5 हजार 194 घरांची विक्री म्हाडाला करता आलेली नाही. या घरांसाठी विविध योजना आणि नेहमी सोडत काढन देखील पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या घरांची अजून पर्यंत विक्री न झाल्यामुळं त्यांच्या देखभालीचा खर्च सुद्धा म्हाडाला करावा लागत असल्याने या घरांची शक्य होईल तितक्या लवकर विक्री करण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न सुरू आहे. म्हणून आता या घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाने नवीन धोरण तयार केलं आहे. आणि या नवीन धोरणाला म्हाडाच्या बैठकीत मंजुरी देखील देण्यात आली आहे. ज्यानंतर आता कोकण मंडळाकडून या तरतुदींची अमलबजावणी करत घरांची विक्री सुरु करण्यात आली आहे (Mhada Konkan Lottery)..

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

Leave a Comment