खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, पहा कुठे असणार म्हाडाची घरे?

Affordable Mhada Flats : मुंबई असो की पुणे घरांच्या मागणीने सगळीकडेच जोर धरला आहे. म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस म्हाडाच्या घरांची मागणी वाढत चालली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून ‘म्हाडा’ला जागेची चणचण भासत असल्यामूळे परवडणारी घरे (Affordable Flats Mumbai) उपलब्ध करून देण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. असे असताना राज्यातील म्हाडाच्या इतर मंडळांमध्ये देखील म्हाडाच्या घरांची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान म्हाडाच्या घरांसंदर्भात एक मोठी बातमी आली आहे. आता लवकरच सामान्य नागरिकांसाठी महामार्गालगत ‘म्हाडा’ची परवडणारी घरे तयार होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना चांगली कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी म्हाडाचे घर घेता येणार आहे.

म्हाडा घेणार पैशांच्या बदल्यात भूखंड

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी म्हाडाने तब्बल 1 हजार कोटी रुपये एवढा पैसा ‘एमएसआरडीसी’ला दिला आहे. असे असताना सध्याच्या काळात घरे उभारण्यासाठी म्हाडाकडे जागा उपलब्ध नाही. म्हणून पैशांच्या बदल्यात ‘समृद्धी’ महामार्गाजवळ भूखंड (Plot) घेण्याच्या म्हाडाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत भूखंडाचा शोध घेण्याचे निर्देश ‘म्हाडा’कडून आपल्या पाच प्रादेशिक मंडळांना देण्यात आले आहेत. त्यामूळे येत्या काळात सामान्यांसाठी महामार्गालगत म्हाडाची घरे घेता येणार आहे..

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

याठिकाणी तयार होणार म्हाडाची घरे (Mhada Flats)

सामान्यांना माफक दरात घरे उपलब्ध झाली पाहिजे म्हणून आता म्हाडाने जागेचा शोध सुरू केला असून नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये समृद्धी महामार्गालगत जागेचा शोध सुरू आहे. सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारी घरे उभारणे आणि नियोजनबद्ध शहर वसवणे असा म्हाडाचा मुख्य उद्देश असल्याचं सांगण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाशेजारी जमीन उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी आवश्यकतेनुसार परवडणारी घरे उभारली जातील आणि शहराची उभारणी देखील केली जाणार असल्याची माहिती ‘म्हाडा’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

अरे वा! नवी मुंबईत सिडकोची नवी योजना; मध्यमवर्गीयांना कमी किमतीत मिळणार घर, येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment