आज म्हाडाच्या घरांची सोडत, घरबसल्या फेसबूक वर असे पहा सोडतीचे थेट प्रक्षेपण..!

म्हाडाच्या घरांसाठी (Mhada Flats) अर्ज करणार्‍यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज (24 फेब्रुवारी) म्हाडाच्या घरांची सोडत काढली जात असून या सोडतीचे थेट प्रक्षेपण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. या सोडतीचे थेट प्रक्षेपण तुम्हाला फेसबूक वर पाहता येणार आहे. हे सोडतीचे थेट प्रक्षेपण कसे पहावे? आणि सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी कशी पहावी? याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 एवढ्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery) आज (24 फेब्रुवारी) सोडत काढली जात आहे. ठाण्यात (Thane) असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये आज सकाळी 10.00 वाजता ही संगणकीय सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते पार पडणार आहे. या सोडतीतील 5311 एवढ्या घरांसाठी आतापर्यंत एकूण 31,871 एवढे अर्ज आले असून यात अनामत रकमेसह भरलेले अर्ज 25,078 एवढे आहेत.

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, येथे क्लिक करून पहा बातमी..

आता म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर पहा सोडतीचे थेट प्रक्षेपण

कोंकण मंडळाकडून सोडतीच्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम ठिकाणी उपस्थित अर्जदारांसाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता येणार आहे. विशेष म्हणजे घरबसल्या फेसबूक वर सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सोडतीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या https://www.facebook.com/mhadaofficial या अधिकृत फेसबूक पेजवर बघण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. सोडतीच्या वेब कास्टिंगची लिंक म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून नागरिकांना काही वेळातचं सोडतीचा निकाल जाणून घेता येईल.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी कुठे व कशी पाहणार?

सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी तुम्हाला म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजल्यानंतर पाहता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना एसएमएसच्या माध्यमातून विजेता ठरल्याबाबतच मेसेज त्यांनी अर्जसोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर लगेच प्राप्त होणार आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Leave a Comment