सरकारकडून घर पाहिजे? आता सरकारने दिली एक लाख घरांची गोड बातमी; पहा कधी मिळणार ही घरे?

ठाणे : सामान्य परिस्थिती असलेले कुटुंब मुंबई सारख्या शहरात हक्काचे घर (2 BHK Flat Mumbai) विकत घेऊ शकत नाही. कारण घरांच्या किंमती या सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना हक्काची घरे मिळावी आणि त्यांना स्वाभिमानाने जगता यावे म्हणून सरकार पीएम आवास आणि म्हाडा-सिडको सारख्या गृह योजना (Mhada Housing Scheme) राबवते. दरवर्षी या योजनांच्या माध्यमातून अनेकांना हक्काची घरे मिळतात. मुंबईत म्हाडा लॉटरीतून (Mhada Lottery Mumbai) अनेकांना हक्काची घरे मिळाली आहेत. आता देखील तुम्हाला सरकारी योजनेतंर्गत घर घेण्याची संधी मिळणार आहे. अलीकडेच सरकारने 1 लाख घरांची गोड बातमी दिली आहे. त्यामुळे सामान्यांना सरकारी योजनेतून घर घेण्याची पुन्हा संधी मिळणार आहेत.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

कधी मिळणार ही घरे?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल (24 फेब्रुवारी) ठाण्यात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 एवढ्या घरांची सोडत (Mhada Lottery) पार पडली. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर बनवण्यासाठी प्रत्येकाला हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता राज्य सरकारकडून वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यामधील प्रत्येक सामान्य नागरिकाला हक्काचे घर मिळावे, असा राज्य शासनाचा संकल्प असल्याचा आणि पुढील वर्षभरामध्ये तब्बल एक लाख घरे वितरित करण्याचा गृहनिर्माण विभागाचा संकल्प असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

काल म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5311 एवढ्या घरांची सोडत काढण्यात आली. सोडत प्रथमच पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली आहे. आता कुणालाही सोडती संदर्भात तक्रार करण्याची संधी ठेवण्यात आली नाही. ज्या लाभार्थ्यांची निवड झाली अशांना ऑनलाईन मेसेज पाठविण्यात आले आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून घरांची नोंदणी जास्तीत जास्त सुलभ करण्यात आली आहे. आणि सुरू करण्यात आलेल्या ई फॉर्म पद्धतीमुळे नागरिकांना होणारा त्रास देखील कमी झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे येत्या काळात लाभार्थींना पैसे भरण्याचा त्रास देखील कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

खुशखबर! महामार्गावर मिळणार म्हाडाचे स्वस्त घर; म्हाडाने उचलले ‘हे’ पाऊल, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment