शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस धो-धो पाऊस कोसळणार, पंजाबराव डख यांचे मोठे भाकीत

Panjabrao Dakh News : गेल्या 15-16 दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस नाही. त्यामुळे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली तरी पावसाचा जोर कमी आहे. काल राज्याच्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात पाऊस झाला. मात्र मुसळधार पाऊस झालेला नाही.

मात्र आता शेतकऱ्यांनी काळजी करू नये, येत्या अडीच महिन्यांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून खंडित झालेला पाऊस पुन्हा एकदा जोर धरेल… असा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला.

पंजाब राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता राज्यात जोरदार पाऊस सुरू होणार आहे. सर्वप्रथम हा पाऊस विदर्भात होणार आहे. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या इतर भागात पसरेल. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

22 ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या काळात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस होईल, असे त्यांनी सांगितले आहे. वास्तविक, गेल्या महिन्यात या दोन्ही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला नाही.

मात्र आता या जिल्ह्यात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून येत्या काही दिवसांत दोन्ही जिल्ह्यांत दमदार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे 25 ऑगस्टपासून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल आणि 5 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

एकूणच, पंजाब राव यांनी अंदाज वर्तवला आहे की आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण पंजाबरावांची ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे पाहावे लागेल.

वाचा : तूर 10 हजारांवर ; सोयाबीन बाजारभाव कधी वाढणार? जाणून घ्या | Soybean Rate

Leave a Comment