सिडकोच्या घरासाठी अर्ज करत असाल तर आता झाला हा मोठा बदल, पहा बातमी..!

Cidco Flats : मुंबईत स्वतःचे घर (2 bhk flat Navi Mumbai) घेण्यासाठी प्रतेक जण प्रयत्न करत असतो. मुंबईत घरांच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर असल्याने लोक म्हाडा-सिडको या योजनांसाठी अर्ज करून लॉटरीच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात घर घेतात. सध्या तुम्ही नैना क्षेत्रातील सिडकोच्या घरांसाठी (Cidco Flats Navi Mumbai) अर्ज करू शकता. पण नैना प्रकल्प परिसरामधील सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Cidco Flats Navi Mumbai

सध्या नैना क्षेत्रातील सिडकोच्या घरांसाठी (Cidco Flats) लोकांनी पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सिडकोने या योजनेतील घरांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिडकोच्या या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत 18 ऑक्टोबर पर्यंत होती. पण आता ही मुदत वाढविण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता 27 ऑक्टोबर पर्यंत सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे.

ऑफर.. ऑफर.. स्वस्तात घर घेण्याची मोठी ऑफर; आता ही संधी सोडू नका, येथे क्लिक करून पहा बातमी..!

नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआर नुसार 4 हजार चौरस मीटर किंवा त्याहून जास्त क्षेत्रफळाच्या भूखंडांवरती गृहप्रकल्प बांधत असताना सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटा मधील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्यानुसार भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20 टक्के एवढी जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांकरिता उपलब्ध करून देणे नैना प्रकल्प क्षेत्रामधील विकासकांना बंधनकारक आहे. त्यानुसार या क्षेत्रामधील 7 विकासकांकडून सिडकोकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्या माध्यमातून 181 एवढ्या सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

त्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 17 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 164 एवढ्या सदनिका आहे. या सदनिकांची विक्री व्हावी यासाठी सिडकोकडून 19 सप्टेंबर या दिवशी याेजना जाहीर करण्यात आली होती. आणि ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता 18 ऑक्टोबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. पण आता ही मुदत संपली आहे आणि या काळामध्ये मिळालेला प्रतिसाद खूपच कमी असल्याने अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढवण्यात आली असून ही मुदत आता 27 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आली आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment