मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट..!

1 bhk flat Mumbai : मुंबई तसेच मुंबई महानगर परिसर म्हणजेच एमएमआर प्रदेशामधील नागरिकांकरिता आम्ही एक खुशखबर घेऊन आलो आहोत. मागील कित्येक वर्षांपासून देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबई घराच्या वाढत जाणाऱ्या किमतीमुळे विशेष अशी चर्चेत आली आहे.

मुंबईमध्ये घरांच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना मुंबईमध्ये तसेच मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये हक्काचे घर (1 bhk flat Mumbai) घ्यायचे असेल तर ते म्हाडा तसेच सिडको च्या घरांचा पर्याय अगदी बिनधास्तपणे निवडू शकतात. वास्तविकपणे बघितले तर मुंबई मंडळाने अलीकडे तब्बल 5000 घरांसाठी लॉटरी काढली आहे. या माध्यमातून मुंबई शहरामध्ये घर घेणाऱ्या हजारो नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे (MHADA Mumbai Lottery). या सोबतच म्हाडा कोकण मंडळाने सुद्धा यंदाच्या वर्षी हजारो घरांची लॉटरी काढली होती.

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी..म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ..

अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा एकदा म्हाडा नव्याने तब्बल 5000 घरांची लॉटरी काढणार अशी बातमी समोर आली आहे. विशेष भाग म्हणजे मंडळाने यासाठी याची पूर्वतयारी सुरू केली आहे (ready to move flats in mumbai). आगामी कालावधीत सोडती मध्ये समाविष्ट असलेल्या विविध घरांच्या किमती सुद्धा समोर आल्या आहेत. म्हाडा यंदाच्या वर्षी दुसऱ्यांना लॉटरी काढेल आणि दुसऱ्या लॉटरीमध्ये तब्बल 5000 घरांचा समावेश या ठिकाणी होईल. या सर्व 5000 घरांची जाहिरात आता माडाच्या माध्यमातून लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी भेट; ठाण्यात तब्बल 16 हजार परवडणारी घरे..आता स्वस्तात मिळणार घर, कसा घ्याल लाभ?

म्हाडा मंडळाच्या या आगामी सोडतीमध्ये सोडतीत मुंबई यासोबतच परिसरामधील घरांचा समावेश या ठिकाणी केला आहे. खाजगी विकासकांनी बांधलेली जी घरे आहेत याचा सुद्धा समावेश मंडळाने केला आहे. तसेच डोंबिवली मधील खाजगी विकासकांनी जी काही घरे बांधले आहेत, या बांधलेल्या घराचा देखील लॉटरी प्रक्रियेत समावेश केला जाईल अशी महत्त्वाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बाप रे! घराची लॉटरी न लागल्यास पैसे कपात होणार? पहा सिडकोचा नवीन नियम..!

घरांच्या किमती किती राहणार?

मागील लॉटरीच्या तुलनेत या लॉटरी मधील घरांच्या किमती या कमी असू शकतात. हाती आलेल्या माहितीनुसार या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेल्या विविध घरांची किंमत ही 9 लाख 89 हजार रुपयांपासून 42 लाख या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

मुंबई नाही तर याठिकाणी लोक घेताय स्वप्नातील घर, तुम्ही सुद्धा करा खरेदी..!

Leave a Comment