खुशखबर! या लोकांना मिळणार चार बेडरूमची घरे; सिडकोची चार बेडरुमची 525 घरे, पहा कोणाला मिळणार आणि किंमत?

Cidco Flats Navi Mumbai : अलीकडच्या काळात नवी मुंबईत घरांच्या मागणीत प्रचंड वाढ झालेली दिसते. मुंबईत रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध असल्याने मुंबईत घर घेण्याची प्रतेकाची इच्छा असते. पण घरांच्या किंमती जास्त असल्याने बर्‍याच लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. सध्या मुंबईत टू बीएचके घराची (2 bhk flat Navi Mumbai) किंमत कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सामान्य माणूस मुंबईत घर विकत घेऊ शकत नाही. पण म्हाडा आणि सिडको या गृह योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना मुंबईत परवडणाऱ्या दरात घर (Affordable Flats Mumbai) उपलब्ध करून देत आहे. लॉटरीच्या माध्यमातून ही घरे लोकांना दिली जात आहे. अशातच आता सिडकोकडून नवी मुंबईत चार बेडरूमची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही घरे नेमकी कोणाला मिळणार आणि या घरांच्या किंमती किती असणार याची माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.

Cidco Flats Navi Mumbai

नवी मुंबईचा ‘क्वीन्स नेकलेस’ असं म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाम बीच मार्गावर सिडकोकडून आलिशान घरांचा (Luxurious flats) गृहप्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यात 1270 ते 1800 चौरस फूट या आकाराची घरे असणार आहेत.

ऑफर.. ऑफर.. स्वस्तात घर घेण्याची मोठी ऑफर; आता ही संधी सोडू नका, येथे क्लिक करून पहा बातमी..!

नवी मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पापासून 4 ते 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेला बेलापूर ते वाशी या दरम्यानचा पाम बीच मार्ग हा पहिल्यापासूनच महागड्या घरांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. एका बाजूला विस्तीर्ण खाडीकिनारा असलेल्या या मार्गाजवळच सिडकोकडून काही वर्षांपूर्वी अनिवासी भारतीयांसाठी मोठा प्रकल्प उभारण्यात आला होता. आणि याच मार्गावर मुंबई महापालिकेने बेलापूरच्या दिशेने नवीन अद्ययावत असलेले मुख्यालय उभारले आहे आणि या मार्गावर असलेल्या गगनचुंबी इमारतींमध्ये असलेल्या घरांची मुंबई महानगर क्षेत्रामधील महागड्या घरांमध्ये गणना केली जाते.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

आता याच मार्गावर सिडकोकडून (Cidco) राज्याच्या नगरविकास विभागाच्या परवानगीने आमदार, खासदार सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि IAS – IPS अधिकाऱ्यांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. 01 जानेवारी 2020 नंतर निवडून आलेल्या आमदार, खासदारांचा यात समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पामध्ये तीन, साडेतीन तसेच चार बेडरुमची 525 घरे उभारली जाणार आहेत. यात असलेल्या 1270 ते 1800 चौरस फूट आकाराच्या या घरांची विक्री किंमत सव्वादोन कोटी रुपयांपासून ते 3 कोटी 11 लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

मुंबईत स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी; फक्त 10 लाखात 1 बीएचके फ्लॅट, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment