पुलावरून जाताना दोन मुले वाहून गेली, थरकाप उडवणारा व्हिडिओ..!

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालूक्यात असलेल्या अवघडराव सावंगी (ता.भोकरदन ) येथील पुलावरून गावाकडे येताना दोन जण वाहून गेल्याची घटना एक दोन दिवसांपुर्वी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये दोन मुले एक मेकांचे हात पकडून गावाजवळील पूल ओलांडतांना दिसत आहे.

पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे एका मुलाचे चालताना पायाचे संतूलन बिघडते. आणि तो खाली कोसळतो. तिथे काही उपस्थित आलेल्या नागरिकांपैकी काही जन हा थरकाप उडवणारा क्षण आपल्या मोबाइल मध्ये कैद करत होते. त्यापैकी काही लोक त्या मुलांचा पूल ओलंडण्यासंदर्भात अंदाजाच लावत होते तेव्हड्यातच दोन्हीही मुले पुलावरून खाली पडतात. आणि तिथे उपस्तीत असलेल्या लोकांचा थरकाप उडतो.

या वाहून गेलेल्या दोन्ही मुलांपैकी एकाला पकडण्यात यश मिळाल्याची माहिती या व्हिडिओ द्वारे मिळत आहे आणि एकाचा शोध अजून सुरू आहे.

न्यूज़, मनोरंजन, रोचक तथ्य व माहितीपूर्ण लेख याबद्दल अचुक माहिती देण्याचे काम Read Marathi टीम करत आहे. Read Marathi वर प्रकाशित होणारे लेख मिळवण्यासाठी आमचे facebook page लाईक करा.

Leave a Comment