काय सांगता! सामान्यांसाठी दोन लाख घरे; आता स्वस्त घराचं स्वप्न पूर्ण होणार, पहा कामाची बातमी..

Mhada Affordable Flats : सामान्य लोकांसाठी राज्यामध्ये किमान 2 लाख एवढी घरे उभारण्याचा संकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून आखण्यात आला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राला माहिती दिली. म्हाडा ही परवडणाऱ्या दरात घरे (Mhada Affordable Flats) बांधणारी संस्था असल्याने सामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे कशी निर्माण होतील, या दिशेनेच म्हाडाचे (MHADA) धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती देखील जैस्वाल यांनी दिली. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या सूचनांकरिता म्हाडा उपाध्यक्षांच्या कार्यालयामध्ये सूचना पेटी देखील बसविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4082 एवढ्या घरांसाठी सोडत प्रक्रिया राबविली होती. प्रथमच कोणताही मानवी हस्तक्षेप न होऊ देता सोडत काढण्यात आली. दरम्यान बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की “म्हाडाने घरांचा साठा वाढविण्यावर भर दिला पाहिजे”. अशा पद्धतीने आता म्हाडाने धोरण आखण्याचे ठरविलेले आहे. म्हाडाकडे सामान्य लोक मोठ्या अपेक्षा ठेऊन घरांसाठी अर्ज करतात. म्हणून म्हाडाने जास्तीत जास्त घर निर्मिती केलीच पाहिजे आणि त्या दिशेने कामकाज सुरू करण्यात आले आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

म्हाडाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त घरे कशी निर्माण होतील, यावरच भर असणार असल्याची माहिती जैस्वाल यांच्याकडून मिळाली. म्हाडाचे एकूण 114 अभिन्यास आहे आणि म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासामधून जण सामान्यांसाठी घरांचा साठा निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

Mhada Flats Mumbai

म्हाडा मुंबईमध्ये 1 लाख घरे (Mhada Flats Mumbai) वितरीत करणार असल्याचं आणि म्हाडाद्वारे मुंबईत वर्षभरामध्ये 1 लाख घरे उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. त्यामुळे आता स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जे विकासक 4 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम करतात, त्यांना म्हाडाला 20 टक्के घरे देणे बंधनकारक आहे. अशा माध्यमातून मिळणारी घरे उपलब्ध होतील आणि त्यानुसार घरांसाठी लॉटरी काढून वितरीत केली जातील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

अरे वा! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट; किंमत फक्त एवढी, येथे क्लिक करून पहा..

Leave a Comment