अखेर प्रतीक्षा संपली! आजपासून करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज, मिळेल कमी पैशात हक्काचे घर..!

MHADA Flats Pune : कमी पैशांत घरांचे स्वप्न पाहणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर आज मंगळवार रोजी म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5 हजार 863 एवढ्या घरांसाठी (MHADA Flats Pune) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यानुसार आज दुपारी 12 वाजेपासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे. ही अर्जविक्री- स्वीकृतीची प्रक्रिया 29 सप्टेंबरपर्यंत सुरु असणार आहे आणि या ही सोडत 18 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. मार्च महिन्यात पुणे मंडळाद्वारे जवळपास 6 हजार एवढ्या घरांची सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर अजून एक सोडत काढण्याचे जाहीर करण्यात आले होते आणि त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली होती. बर्‍याच दिवसांपासून इच्छुक असणार्‍यांना या सोडतीची प्रतीक्षा लागली होती.

पहा घरांची सर्व माहिती (MHADA Flats Pune)

अखेर आज मंडळाने तब्बल 5 हजार 863 एवढ्या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी म्हणजेच आज दुपारी 12 वाजेपासून अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. अनामत रक्कमेसह 29 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे आणि पात्र अर्जांची अंतिम यादी 16 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुण्यामधील म्हाडाच्या कार्यालयामध्ये 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील 403, पीएमएवाय योजनेमधील 431 आणि 15 टक्के सामाजिक गृहयोजनेमधील 344, म्हाडा गृहनिर्माण प्रथम प्राधान्य योजनेमधील 2445 तसेच 20 टक्क्यामधील 2240 एवढ्या घरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करावा?
येथे क्लिक करून पहा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात आपले हक्काचे घर किंवा फ्लॅट (Flat in Pune) असावा असे प्रत्येकाचे स्वप्न असते. सगळं आयुष्य काम करून देखील बर्‍याच नागरिकांना स्वतःचे घर पुण्यासारख्या मोठ्या शहरात विकत घेता येत नाही.

येथे वाचा – म्हाडाच्या लॉटरीत घर लागले तर ही चूक करू नका! नाहीतर फिरेल तुमच्या स्वप्नांवर पाणी; येथे क्लिक करून पहा माहिती..

पुण्यात घर घ्यायचे म्हटले की घराच्या किमती पाहूनच सर्वसामान्य नागरिक डोक्याला हात लावतात. कारण येथील घराच्या किमती लाखो कोटींमध्ये आहे. कर्ज घेऊन घर घेतल्यानंतर लोकांना आयुष्यभर त्याचे हप्ते फेडत राहावे लागते (1 bhk flat in pune). नागरिकांची ही समस्या लक्षात घेत म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांना अगदी परवडणाऱ्या दरात घर खरेदी करता यावे यासाठी सोडत काढली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन लोकांना स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे (pune 1 bhk flat).

येथे वाचा – खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

Leave a Comment