काय सांगता! आता लाईट नसली तरी या पद्धतीने करा मोबाईल चार्ज; फक्त एवढ्या रुपयात आणा ही वस्तू..!

Solar Power Bank : तुम्हाला माहिती असेल की अलीकडे सोलर ऊर्जेचा (Solar Energy) वापर बर्‍याच ठिकाणी केला जात आहे. प्रतेक क्षेत्रात सोलर ऊर्जेचा वापर वाढत आहे. आता सध्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोलर ऊर्जेवर चक्क आपला मोबाईल चार्ज केला जात आहे. ज्या उपकरणाद्वारे आपण सोलर ऊर्जेचा वापर करून मोबाईल चार्ज करणार आहोत त्याला सोलर पॉवर बँक (Solar Power Bank) म्हणतात. यामुळे आता मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला लाईट वर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. फक्त हे सोलर पॉवर बँक घरी आणा आणि त्याची उन्हात चार्जिंग करा आणि वाटेल तेव्हा आपला मोबाईल चार्ज करा. विशेष म्हणजे या सोलर पॉवर बँकची किंमत (Solar Power Bank Price) देखील खूप कमी आहे.

असा चार्ज होतो स्मार्टफोन

आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण थेट सूर्यप्रकाशाचा (उन्हाचा) वापर नाही करू शकत, त्यासाठी आपल्याकडे सोलर पॉवर बँक (Solar Power Bank) हे उपकरण असणे गरजेचे आहे. हे उपकरण उन्हात चार्ज होते आणि नंतर यावर आपण आपला मोबाईल केव्हाही आणि कोठेही चार्ज करू शकतो.

येथे वाचा – आजपासून करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

सोलर पावर बँकचे फायदे काय?

तुम्हाला देखील माहिती आहे की आजच्या धावपळीच्या जीवनात बर्‍याच जणांना स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी देखील वेळ नसतो, म्हणून ते पॉवर बँक वापरतात. पण ही पॉवर बँक चार्ज करण्यासाठी देखील वेळ लागतो. तुम्हाला सोलर पॉवर बँक खरेदी करायची असेल तर तुम्ही खूप कमी किमतीत याची खरेदी करू शकता. या सोलर पॉवर बँकला सूर्यप्रकाशात कुठेही ठेवून चार्ज करू शकता. वीज नसताना देखील ती आपोआप सौरऊर्जेने चार्ज होते. याठिकाणी आपण बाजारात उपलब्ध असलेल्या काही स्वस्त सोलर पॉवर बँक पाहणार आहोत..

खुशखबर! आता येथे कमी पैशात घेता येणार हक्काचे घर; येथे क्लिक करून पहा कोठे आणि कधी असणार घरांची लॉटरी?

कॉलमेट सोलर पॉवर बँक (CALLMATE Solar Power Bank)

कॉलमेट सोलर पॉवर बँक ही एक सोलर पॉवर बँक आहे. ज्याची क्षमता 10000 mAh एवढी आहे. याला तुम्ही सूर्यप्रकाशात तसेच लाईटवर देखील चार्ज करू शकता. विशेष म्हणजे या सोलर पॉवर बँक वर तुम्ही एकाच वेळी 4 मोबाईल चार्ज करू शकता. सध्या ऑफर मध्ये हा सोलर पॉवर बँक Amazon वर फक्त 1299 रुपयात मिळत आहे.

येथे वाचा – म्हाडाच्या लॉटरीत घर लागले तर ही चूक करू नका! नाहीतर फिरेल तुमच्या स्वप्नांवर पाणी; येथे क्लिक करून पहा माहिती..

Leave a Comment