अरे वा! म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट, किंमत फक्त एवढी..!

Pune Mhada Lottery : पुण्यामधील पिंपरी भागात 176 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला 3 बीएचके टेरेस फ्लॅट (3 BHK Flat Pune) बाजारभावापेक्षा कमी किंमतीमध्ये विकत घेण्याची संधी म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पुण्यामधील 5 हजार 863 एवढ्या घरांच्या सोडतीमध्ये (Pune Mhada Lottery) मंडळाकडून पाहिल्यांदाच चार टेरेस फ्लॅट विक्रीसाठी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता या घरांची किंमत (Flat Price Pune) निश्चित करण्यात आलेली असून या घरांना चांगला प्रतिसाद मिळणार, असा विश्वास पुणे मंडळाद्वारे व्यक्त करण्यात आलेला आहे.

पुण्यामधील 5 हजार 863 घरांसाठी मंगळवारी अर्ज विक्री–स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पुण्यातील या घरांसाठी 18 ऑक्टोबर या दिवशी सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या मुंबईमधील सदनिकांच्या (Flat in Mumbai) किंमती लाखांचा आकडा पार करून कोटींच्या घरात गेल्या आहेत. पुण्यातील म्हाडाच्या घरांच्या किमती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..

घरांच्या किंमती पहाण्यासाठी
येथे क्लिक करा

मुंबई मंडळाच्या 14 ऑगस्ट रोजीच्या सोडतीमध्ये 1 कोटी रुपये या किंमती पासून ते थेट साडेसात कोटी रुपयांपर्यंत घरांच्या किंमती होत्या. आता पुण्यामधील म्हाडाच्या घरांच्या सोडतीमधील घरांच्या किंमती देखील 1 कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. सध्या पुणे मंडळाच्या या सोडतीमध्ये 1 कोटी 10 लाख 95 हजार 200 आणि 1 कोटी 11 लाख 69 हजार 900 रुपये किंमतीच्या काही घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये चार टेरेस फ्लॅट असून प्रथमच म्हाडाच्या सोडतीमध्ये टेरेस फ्लॅट विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आलेले आहे.

येथे वाचा – म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

पुणे मंडळाच्या पिंपरीमधील संत तुकाराम नगर याठिकाणी असलेल्या प्रकल्पामधील तीन बीएचके (3 BHK Flat Pune) असलेल्या 37 घरांचा समावेश आहे. या 37 सदनिकांपैकी यात चार टेरेस फ्लॅट असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून मिळाली आहे.

टेरेस फ्लॅट म्हटले की उंच इमारतीमधील घर असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र पुणे मंडळाच्या सोडतीमधील (Pune Mhada Lottery) ही घरे याला अपवाद असल्याचं सांगण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही घरे उंच इमारतीमध्ये नाही. या घरांना प्रशस्त गच्ची देण्यात आली आहे. प्रशस्त आणि मध्यवर्ती ठिकाणच्या या घरांना चांगला प्रतिसाद मिळणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

येथे वाचा – आता करा म्हाडाच्या 5863 घरांच्या लॉटरीसाठी अर्ज; मिळेल कमी पैशात हक्काचे घर, येथे क्लिक करून पहा कसा करावा अर्ज?

या परिसरामध्ये 7 ते 8 हजार प्रति चौरस फूट असा दर असताना म्हाडाने फक्त प्रति चौरस फूट 5 हजार 800 चौरस फूट असा दर निश्चित केला आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा परवडणाऱ्या दरामध्ये ही घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

येथे वाचा – घर खरेदी करताना या 3 गोष्टी चेक करा; भविष्यात मिळू शकतो दुप्पट पैसा, येथे क्लिक करून वाचा बातमी..

Leave a Comment