स्वस्तात घर पाहिजे? कोकण मंडळाच्या लॉटरीला मोठी मुदतवाढ? पहा कामाची बातमी..!

Affordable Mhada Flats : म्हाडा कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठी सुरू असलेल्या अर्जविक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला लवकरच मंडळाद्वारे मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे. कोकण मंडळातील बोळिंज आणि विरारमधील म्हाडाच्या घरांसह (Mhada Flats) पंतप्रधान आवास योजनेमधील घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याने पर्यायाने सोडतीला देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे लक्षात घेऊन अखेर सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा विचार मंडळाकडून सुरू करण्यात आला असून एक ते दोन दिवसांमध्ये यासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

Affordable Mhada Flats

कोकण मंडळाकडून मे महिन्यात 4654 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त घरे विक्री न होता पडून राहिली. म्हणूनच आता मंडळाकडून मे महिन्यामधील सोडतीमध्ये विक्री न झालेले गाळे हे नवीन उपलब्ध झालेल्या गाळ्यांसोबत 5311 एवढ्या घरांसाठी नव्याने सोडत जाहीर केली. सोडतीतील या 5311 घरांसाठी सप्टेंबरमधील 15 तारखेपासून अर्जविक्री-स्वीकृती सुरू झाली आहे. पण या अर्जविक्री-स्वीकृतीला खूपच कमी मिळत आहे. या सोडतीला मे महिन्यातील सोडतीपेक्षा देखील कमी प्रतिसाद मिळाला आहे.

दिवाळीला संधीचं सोनं करा; ठाण्यात घ्या फक्त 11 लाखात घर, येथे क्लिक करून पहा बातमी..

या सोडतीतील 5311 एवढ्या घरांसाठी काल मंगळवारी 4 वाजेपर्यंत 11 हजार 213 एवढ्या लोकांनी अर्ज भरले आहेत. तर यापैकी फक्त 5713 एवढ्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज जमा केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत प्रत्यक्षात या सोडतीकरिता 5713 एवढे अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ध्या किंमतीत मिळणार म्हाडाचं सर्वात मोठं घर; डोंबिवलीत घर उपलब्ध, पहा बातमी..

अर्जविक्री-स्वीकृतीची ही प्रक्रिया 18 ऑक्टोबर रोजी संपणार असून याकरिता आता फक्त आठवड्याभराचा कालावधीच शिल्लक आहे. या कालावधीमध्ये अनामत रकमेसह 10 हजार तरी अर्ज येतील की नाही? असा प्रश्न सध्या मंडळासमोर उभा आहे. त्यामुळे आता सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती मंडळामधील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली आहे. तसेच यासंदर्भात काही दिवसांमध्ये अंतिम निर्णय जाहीर होईल, असं देखील त्यांनी सांगितले.

मुंबईत याठिकाणी मिळणार बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

1 thought on “स्वस्तात घर पाहिजे? कोकण मंडळाच्या लॉटरीला मोठी मुदतवाढ? पहा कामाची बातमी..!”

Leave a Comment