आता घ्या घर; स्वस्तात होम लोन देणार्‍या बँकांची यादी आली, पहा यादी..!

अलीकडच्या काळात घर खरेदी करणे एक मोठे काम समजले जाते. कारण घर घेण्यासाठी बहुतांश लोकांची आयुष्यभर केलेली कमाई खर्च होते. जर मुंबई सारख्या शहरात घर घेत असाल तर याठिकाणी परिस्थिती अजूनच खराब आहे. मुंबईत घर (2 BHK Flats Mumbai) घेण्यात काहींचे तर संपूर्ण आयुष्यच निघून जाते. त्यामूळे घर खरेदी करण्यापूर्वी सामान्यांना अनेक वेळा विचार करावा लागतो. असं असलं तरी हक्काच्या घरात माणसाला खरी सुख-शांती मिळते असं अनेकदा बोललं जातं. त्यामुळे हक्काचं घर तर घेणारचं असा निर्णय घेताना काही जण दिसून येतात. मग त्यासाठी पैशांची जुळवाजुळव केली जाते. अनेक लोक होम लोन (Home Loan) काढतात. जर तुम्हालाही घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल आणि त्यासाठी होम लोन घ्यायचे असेल तर आज आपण स्वस्तात होम लोन देणार्‍या बँकांची यादी पाहणार आहोत. या बॅंकांतून स्वस्त होम लोन (Cheap Home Loan) घेऊन तुम्ही घराचे स्वप्न पूर्ण करू शकता.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

सध्याच्या काळात घरांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की सर्वसामान्य लोकांना घर घेण्यासाठी होम लोन घ्यावेच लागते, अन्यथा एवढा पैसा जमवणे सामान्यांना शक्य होतंच नाही. त्यासाठी होम लोनचा एक चांगला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. पण होम लोन घेत असताना त्याचे व्याजदर काय? स्वस्त होम लोन कुठे मिळेल? याची माहिती घेणे गरजेचे असते. त्यासाठी आपण स्वस्त होम लोन देणार्‍या बँकांची माहिती आणि त्यांचे व्याजदर याची माहिती पाहणार आहोत.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

स्वस्तात होम लोन देणार्‍या बँकांची यादी

(1) बँक ऑफ इंडिया (Bank Of India) : जर तुम्ही घर खरेदीसाठी होम लोनचा पर्याय स्वीकारला असेल तर आज आपण देशातील अशा प्रमुख बँकांची माहिती घेत आहोत ज्या कमी व्याजदरात सर्वसामान्य ग्राहकांना होम लोन देत आहेत. आपल्या देशात एकूण 12 पब्लिक सेक्टर बँक आहेत. यापैकी एक बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया (Bank Of India). या बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त व्याजदरात होम लोन ऑफर करण्यात येत आहे. बँक ऑफ इंडियाकडून 8.30 टक्के या दरात होम लोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे होम लोनची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना कमाल 30 वर्ष एवढा रिपेमेंट पिरियड मिळतो. आपल्या मालमत्तेच्या किमतीच्या 90% एवढे होम लोन देण्यात येते.

मुंबईत ही ट्रिक वापरून घर खरेदी करा; होईल मोठा फायदा, येथे क्लिक करून पहा..

(2) स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून किमान 8.40% एवढ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या लोनचा रिपेमेंट कालावधी 30 वर्ष एवढा असतो. विशेष म्हणजे या बँकेकडून महिलांना व्याजजदरात 0.05% एवढी अतिरिक्त सूट देण्यात येते.

(3) बँक ऑफ बडोदाकडून 8.40 ते 10.60% एवढ्या व्याजदरात ग्राहकांना होम लोन उपलब्ध करून देण्यात येते. पण बँकेकडून आकारण्यात येणारे हे व्याजदर सिबिल स्कोरनुसार ठरवले जाणार आहेत. चांगला सिबिल स्कोअर असणार्‍यांना कमी दरात होम लोन मिळते.

एचडीएफसी बॅंक (HDFC Bank) : एचडीएफसी बॅंक ग्राहकांना 30 ते 75 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येते. या बँकेचा होम लोनसाठी 8.35% एवढा किमान व्याजदर असतो. पण, ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला आहे अशांना किमान व्याज दरामध्ये होम लोन उपलब्ध होते.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment