Mhada Flats Mumbai : मुंबईत घरांच्या किंमती प्रचंड वाढल्याने लोक आता म्हाडाचे घर (Mhada Flats Mumbai) मिळवण्यासाठी धडपड करताना दिसून येतात. कारण म्हाडाची घरे सामान्यांना घेता येतील अशा परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात. घर विक्रीसाठी म्हाडाकडून नेहमीच नवनवीन योजना (Mhada Scheme) आणल्या जातात. त्यामुळे घरांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. अलीकडेच म्हाडाने घर विक्रीसाठी नवीन योजना आखली आहे. आता म्हाडाच्या घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत केली जाणार आहे. विशेष म्हणजे फक्त 25 टक्के रक्कम भरून म्हाडाचे घर (Mhada Flats) घेता येणार आहे.
म्हाडाची 11 हजारांपेक्षा जास्त घरे तसेच अनेक भूखंड विक्रीविना तशीच पडून आहेत. या घरांची आणि भूखंडाची एकत्रित किंमत सुमारे 3 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता या घरांची विक्री खासगी संस्थेकडून करण्याचे धोरण म्हाडाकडून आखण्यात आले आहे. म्हाडाचे संबंधित मंडळाकडून निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम आणि विपणन क्षेत्रांतील संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या नवीन धोरणानुसार खासगी संस्थेकडून घर खरेदी करणाऱ्यांना सुरुवातीला घराच्या एकूण किमतीच्या 25 टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे. आणि उर्वरित राहिलेली 75 टक्के रक्कम मासिक हप्त्यांद्वारे भरण्याची मुभा मिळणार आहे. विक्रीविना पडून असलेल्या या घरांसाठी तसेच भूखंडांसाठी आतापर्यंत अनेकदा सोडत काढण्यात आली आहे. तसेच या घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेमध्ये करण्यात आला. तरी देखील या घरांची विक्री झाली नाही.
मुंबईत याठिकाणी घर घेणाऱ्यांचं नशीब उजळणार, घर घेताना या लोकेशनची करा निवड, येथे क्लिक करून पहा..
विरार-बोळींजमध्ये सर्वात जास्त घरे (Mhada Flats Mumbai)
राज्यभरात विक्रीविना पडून असलेल्या घरांचा शोध म्हाडाच्या समितीकडून घेण्यात आला होता. आता कोकण मंडळ आणि खासगी संस्थेसमोर विरार-बोळींज येथील तब्बल 5 हजार घरांच्या विक्रीचे आव्हान असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही घरे आणि भूखंडांच्या विक्रीकरिता पाच पर्याय सुचविले गेले होते. त्यातील खासगी संस्थेची नियुक्तीचा पर्याय स्वीकारला गेला आहे. घर विक्री करणार्या खासगी संस्थेला घराच्या विक्री किमतीच्या 5 टक्के एवढी रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.
मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..