मुंबईत ही ट्रिक वापरून घर खरेदी करा, होईल मोठा फायदा..!

मुंबईत घर किंवा फ्लॅट (2 BHK Flats Mumbai) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. आता तुम्ही एका ट्रिकचा वापर करून मुंबईत घर खरेदी केल्यास तुम्हाचा मोठा फायदा होणार आहे. सध्या मुंबईत सगळीकडेच घरांचे दर प्रचंड वाढल्याने आता मुंबईत घर विकत कसे घ्यावे? असा प्रश्न मुंबईतील प्रतेक सामान्य माणसाला पडला आहे. मुंबईत लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबईतील घरे देखील महागली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला मुंबईत हक्काचे घर (2 BHK Flats Mumbai) खरेदी करायचे असेल तर मोठा पैसा मोजावा लागतो. पण जर तुम्ही एका ट्रिकने घर खरेदी केले तर तुम्हाला चांगलाच फायदा होईल.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

मुंबईत घर घेताना वापरा ही ट्रिक

मुंबईत घर खरेदी करायचे असेल तर मुंबईकरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्यात महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत मिळते. मागील वर्षी, राज्य सरकारकडून या सवलतीच्या घरांच्या विक्रीसाठीचा 15 वर्षांचा निर्बंध काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत सवलतीच्या दरात महिलांच्या नावे फ्लॅट्स म्हणजेच घर घेण्याचे प्रमाण वाढत आहे. महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत मिळते. त्यात पुन्हा आता राज्य सरकारकडून या सवलतीच्या घरांच्या विक्रीसाठीचा 15 वर्षांचा निर्बंध काढून टाकण्यात आल्याने महिलांच्या नावे घर घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा पद्धतीने महिलांच्या नावे घर घेतल्यास तुम्हाला फायदा होणार आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

महत्त्वाचं म्हणजे 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये महिलांच्या नावे घर खरेदी करणार्‍यांची संख्या जवळपास निम्म्याने वाढली असल्याचं सांगण्यात येत आहे. 2022 मध्ये 4901 महिलांनी मालमत्तेची खरेदी केली होती. तर 2023 मध्ये यात दुप्पट वाढ झाली असून 9388 महिलांनी मालमत्ता खरेदी केली आहे. मालमत्तेची खरेदी करणाऱ्या महिलांमध्ये 41 ते 50 या वयोगटातील महिलांचे प्रमाण जास्त होते. पण 2023 पासून 60 च्या पुढील वय वर्ष असलेल्या महिला खरेदीदारांची संख्या वाढल्याचं दिसून आलं आहे.

नवी मुंबईत सिडकोचे 1 BHK घर अवघ्या 20 लाखात; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Leave a Comment