ठाण्यात आणखी 3833 घरे; आता ठाण्यात स्वस्तात घर मिळणार?

Thane : ठाण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता ठाण्यात सिडकोकडून आणखी 3 हजार 833 घरे (Cidco Flats Thane) उपलब्ध करून देण्यात येत आहे. या घरांचे बांधकाम सिडको करत असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच सिडकोकडून ठाण्यातील किसननगरमध्ये आणखी 3 हजार 833 एवढी घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या ठाण्याच्या बहुचर्चित क्लस्टर योजनेचा (Cluster Scheme) शुभारंभ मागील वर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किसननगर येथे झाला होता.

मुंबईत ही ट्रिक वापरून घर खरेदी करा; होईल मोठा फायदा, येथे क्लिक करून पहा..

सनराईज इमारत कोसळल्यामूळे 18 रहिवाशांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर ठाणे शहरामध्ये (Thane City) मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व सर्व नागरी पायाभूत सुविधांचा विचार करून पुनर्विकास व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेकडून एकूण 45 एवढे नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तब्बल 1500 हेक्टर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर राबविली जाणारी आशिया खंडामधील पुनर्वसन आणि पुनर्विकासाची ही पहिलीच योजना असल्याचं सांगण्यात येत आहे.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

सिडको करणार 10 हजारांवर घरांचे बांधकाम (Cidco Flats Thane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीमधील अतिशय दाटीवाटीचा भाग असलेले किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र.12 यातील नागरी पुनरुत्थान योजना क्र.1 आणि 2 चा शुभारंभ गेल्या वर्षी 6 जूनला करण्यात आला होता. सिडकोकडून या दोन्ही योजनांतर्गत 10 हजारांवर घरांचे बांधकाम आणि परिसर विकास केला जाणार आहे.

मुंबईजवळ फक्त 13 लाखात घर; याठिकाणी परवडणारी घरे उपलब्ध, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment