काय सांगता! मुंबईत म्हाडाचे गाळे खरेदीसाठी मोठी झुंबड; किंमत फक्त एवढी, आता मुंबईत स्वस्तात गाळे घ्या..!

Mhada Mumbai : सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात घरे (2 bhk in Mumbai) उपलब्ध करून देणारी म्हाडा आता मुंबई शहर तसेच उपनगरांतील जवळपास 173 एवढ्या गाळ्यांची (दुकानांची) विक्री करण्यासाठी ई-लिलाव करत आहे. या गाळ्यांसाठी ई-लिलाव प्रक्रिया 1 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे. मुंबईतील हे व्यावसायिक गाळे खरेदी करण्यासाठी व्यवसायाकांची झुंबड उडालेली दिसतेय. कारण या गाळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाल्यापासून फक्त तीनच दिवसांमध्ये 210 एवढे अर्ज आले आहेत. हे पाहता या गाळ्यांच्या खरेदीसाठी मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाकडून मुंबईमध्ये टोलेजंग निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे आणि या इमारतींच्या तळमजल्यावर व्यावसायिक गाळे म्हणजेच दुकाने बांधण्यात येत आहे (Mhada Shops Mumbai). हे गाळे 16 प्रकल्पांमध्ये असून यात गोरेगाव, न्यू हिंद मिल माझगाव, चारकोप, मालाड आणि शिव यांचा समावेश आहे.

म्हाडाच्या स्वस्त दुकानांची जाहिरात
येथे क्लिक करून पहा

म्हाडाच्या गाळ्यांची किंमत किती?

मिळालेल्या माहितीनुसार या गाळ्यांची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांपासून ते 14 कोटी रुपयांपर्यंत अशी आहे. मुंबईतील हे व्यावसायिक गाळे खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्यांना 19 मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि या ई-लिलावाचा निकाल 20 मार्चला सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी अजून काही दिवस तुमच्या हातात आहे. या गाळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मुलुंड गव्हाणपाडा आणि बिंबिसारनगर याठिकाणी असलेल्या गाळ्यांना जास्त किमती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

Leave a Comment