आनंदाची बातमी! मुंबईत म्हाडाची हायफाय घरे घेण्याची संधी; सुविधा पाहून उडतील हौश, यादिवशी असणार लॉटरी..!

मुंबईत म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची (Mhada Lottery Mumbai) आतुरतेने वाट पाहणार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला म्हाडाची हायफाय सुविधा असलेली अलिशान घरे (Mhada Luxury Flats) म्हाडाच्या लॉटरीतून घेता येणार आहे. मुंबईमध्ये सुमारे 700 एवढ्या घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मुंबईत म्हाडाचे अलिशान घर घेण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे हा गृह प्रकल्प स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असून यात हायफाय सुविधा असणार आहे. यात नेमक्या कोणत्या सुविधा असणार? आणि ही लॉटरी कधी निघणार? याची माहिती जाणून घेऊया.

म्हाडाच्या घरात मिळणार या सुविधा (Mhada Flats Facilities)

म्हाडाकडून नेहमीच सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे (Mhada Affordable Flats) बांधणी जातात. आतापर्यंत म्हाडाकडून मोकळी मैदाने आणि बगीचे अशा सुविधा देण्यात येत होत्या. पण आता प्रथमच म्हाडाकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न असलेल्या गटासाठी स्विमिंग पूल, जिम (Gym), क्लब हाऊस आणि पोडियम पार्किंग अशा हायफाय सोयीसुविधा असलेली घरे तयार करण्यात येत आहे. गोरेगावच्या प्रेमनगर येथे असलेल्या म्हाडाच्या पहिल्या ‘हायफाय’ प्रोजेक्ट मधील 332 एवढ्या घरांचाही या लॉटरीत समावेश करण्यासाठी म्हाडाकडून प्रयत्न केले जाणार आहे.

काय सांगता! फक्त एवढी रक्कम भरून मिळेल म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाची ही लॉटरी कधी निघणार?

गोरेगावमधील प्रेमनगर याठिकाणी 39 मजली असलेल्या टॉवरचे बांधकाम सध्याच्या घडीला जोरात होत असून आतापर्यंत 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. हे बांधकाम वेगाने होत असल्याने येत्या दिवाळीतच मुंबईमधील सुमारे 700 घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या हायफाय घरांसाठी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकणार आहेत.

मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ म्हाडाचे 2 BHK फ्लॅट खरेदी करता येणार; येथे क्लिक करून पहा लोकेशनसह संपूर्ण माहिती..!

1 thought on “आनंदाची बातमी! मुंबईत म्हाडाची हायफाय घरे घेण्याची संधी; सुविधा पाहून उडतील हौश, यादिवशी असणार लॉटरी..!”

Leave a Comment