बाप रे! ठाण्यातील म्हाडाची घरे झाली महाग; पहा किती लाखांनी वाढवली किंमत..!

Mhada Flats Thane : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ घेणार्‍या विकासकांनी म्हाडाला (Mhada) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांकरिता सुपूर्द केलेल्या घरांच्या किमतींमध्ये (Mhada Flat Price) परस्पर वाढ केल्याची बाब निदर्शनास आली आहे. ठाण्यामधील एका प्रकल्पामधील घरांच्या म्हाडाकडून निश्चित करण्यात आलेल्या किमती 6 लाख रुपयांनी वाढविण्यात आल्याने घर खरेदीदार चिंताग्रस्त झाले आहेत. Mhada Flats Thane

कोकण गृहनिर्माण मंडळाकडून ठाण्यातील वर्तकनगर येथील रेमंड कन्स्ट्रक्शनद्वारे 20 टक्के योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 322 चौरस फुटांच्या घरांची किंमत 15 लाख 38 हजार 700 ते 15 लाख 41 हजार 400 रुपये यादरम्यान निश्चित करण्यात आली होती. पण या खरेदी करणार्‍यांना रेमंड कन्स्ट्रक्शनद्वारे देण्यात आलेल्या विक्री किंमत पत्रकानुसार ही किंमत 21 लाख 25 हजार एवढी दाखविण्यात आली आहे.

म्हाडाचं सर्वात मोठं घर डोंबिवलीत; अर्ध्या किंमतीत घर मिळणार? येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हणजेच ही किंमत म्हाडाने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा 6 लाख रुपये जास्त आहे. यासंदर्भात खरेदीदारांनी रेमंड कन्स्ट्रक्शनला पत्र देऊन घरांची किंमत कमी करण्याची विनंती केली. पण रेमंड कन्स्ट्रक्शनकडून पत्र स्वीकारण्याला देखील नकार दिला असल्याचं खरेदीदारांनी सांगितले. विकासकाकडून निश्चित करण्यात आलेल्या किंमतीनुसार या खरेदीदारांना 24 लाख 14 हजार 550 रुपये या घरासाठी भरावे लागणार आहेत. तसेच यात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि आगावू मालमत्ता कर तसेच सेवा व वस्तू कराचा समावेश आहे.

मुंबईत घ्या बजेटमध्ये घर; येथे क्लिक करून पहा स्वस्तात घर घेण्यासाठी बेस्ट ऑप्शन..!

ठाण्यामधील (Thane) विहंग वूड प्रकल्पामध्ये विकासकाकडून म्हाडाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या किंमतीनुसार खरेदीदारांना विक्री किंमत पत्रक देण्यात आले आहे.. रेमंड रिअल्टीकडून मात्र म्हाडाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या किंमतीपेक्षा 6 लाख रुपये जास्त रकमेचा समावेश करण्यात आला आहे. या संदर्भात कोकण गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांना माहिती विचारण्यात आली असता, त्यांनी म्हाडाने जी विक्री किंमत निश्चित केलेली आहे तितकीच रक्कम विकासकाने आकारली पाहिजे अशी माहिती दिली. त्यामध्ये वाढ करता येणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत इथे मिळणार स्वस्त घरं
येथे क्लिक करून पहा

किंमतीमध्ये करण्यात आलेल्या वाढीचे समर्थन करताना, रेमंड रिअल्टीचे प्रशांत राठोड यांच्याकडून कोकण गृहनिर्माण मंडळाने तशी मुभा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात पायाभूत सुविधा शुल्क, मेट्रो उपकर शुल्क, ठाणे महापालिका विकास आदी शुल्क खरेदीदारांकडून वसूल करण्याची मुभा म्हाडाकडून आम्हाला देण्यात आली आहे. अशा प्रकल्पामध्ये वीज, पाणी, गॅस आणि रस्ते इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता पायाभूत सुविधांसाठी खर्च जास्त येतो, असा दावा राठोड यांच्याकडून करण्यात आला आहे.

म्हाडाचे घर लॉटरीत लागण्यासाठी काय करावे? यासाठी काही ट्रिक असते का? येथे क्लिक करून पहा बातमी..!

कोकण मंडळाच्या वास्तुरचनाकारांकडूनच आम्हाला बांधकामासाठी येणार्‍या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी देखील त्यांनी माहिती दिली. मात्र कोकण मंडळाचे कार्यकारी अभियंता उदय मराठे यांनी याबाबतीत इन्कार देत निश्चित केलेली विक्री किंमतच आकारावी लागेल, असं स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment