काय सांगता! आता लॉटरी शिवाय घ्या म्हाडाचा 2 BHK फ्लॅट; मिळतील भरमसाठ सुविधा, पहा लोकेशन, सॅम्पल फ्लॅट आणि किंमत..!

2 BHK Flats Mhada : विना लॉटरी तुम्हाला म्हाडाचे घर घ्यायचे आहे का? तर मग आता तुम्हाला म्हाडाचे 2 बीएचके घर लॉटरी शिवाय घेता येणार आहे. अनेक जण म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करतात पण सर्वांना लॉटरीत घर लागत नाही. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीत घर कसे मिळते? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता तुम्ही म्हाडाचे 2 बीएचके घर (2 BHK Flats Mhada) लॉटरी शिवाय घेऊ शकता. म्हाडाचे हे 2 बीएचके घर घेण्यासाठी म्हाडाच्या वेबसाईटवर जाण्याची गरज नाही, तुम्ही थेट ऑफिसला जाऊन सुद्धा घर बूक करू शकता. विशेष म्हणजे म्हाडाचे हे घर घेण्यासाठी लॉटरीची वाट बघण्याची गरज नाही. तसेच तुम्ही एका मजल्यावर 1 किंवा त्यापेक्षा जास्त घरे घेऊ शकता. म्हाडाचा हा 2 बीएचकेचा प्रकल्प आहे. यात म्हाडाचे 2 बीएचकेची 470 घरे आहेत. हा प्रकल्प कुठे आहे? येथील घरे कशी आहेत? सुविधा काय-काय आहे? आणि सॅम्पल फ्लॅट आतून कसा आहे? हे आपण येथे पाहणार आहोत.

फ्लॅटच्या आतील सुविधा

म्हाडाचे हे 2 बीएचकेची घरे आतून कशी आहेत? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. येथील सॅम्पल फ्लॅटमध्ये गेल्यानंतर एक मोठा हॉल तुम्हाला बघायला मिळेल. फ्लॅट मधील खिडक्या देखील मोठ्या आहेत. डायनिंग रूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे येथील प्रतेक फ्लॅटमध्ये तीन बाल्कनी देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे फ्लॅटमध्ये व्हेंटिलेशन खूप चांगलं मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरील फ्रेश हवा मिळणार आहे. तसेच बाल्कनीतून दिसणारा आजूबाजूचा परिसर आणि व्ह्यू देखील खूप छान आहे. यात कॉमन टॉयलेट बाथरूमही छान मिळणार आहे. या फ्लॅटमधील लहान मुलांसाठी असलेले बेडरूम 12’8″×11’0″ या साइजचा आहे. तर दुसरा मास्टर बेडरूम 10’1″×13’8″ या साइजचा आहेत.

पुण्यात फक्त 9 लाखात घ्या म्हाडाचे घर; येथे क्लिक करून पहा घराचे लोकेशन आणि कार्पेट एरिया..!

फ्लॅटच्या बाहेरील सुविधा

या प्रकल्पात लिफ्टची सुविधाही चांगल्या प्रकारची आहे. यात तीन लिफ्ट असून तीनही लिफ्ट वापरायला मिळणार आहेत. तळमजल्यात 2 पार्किंग देण्यात आल्या आहेत. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान (गार्डन) देण्यात आलेलं आहे. तसेच या प्रकल्पात जिम देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आरोग्य मजबूत ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच स्विमिंग पूल, क्लब हाऊस अशा 13 पेक्षा जास्त सुविधा उपलब्ध असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने यूट्यूब चैनलला दिली आहे. या प्रकल्पाच्या शेजारीच मार्केट उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला दैनंदिन गरजेच्या वस्तू जवळच खरेदी करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा आणि कॉलेज देखील येथून जवळ आहे. अशा सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.

खुशखबर! आता म्हाडाची घरे 15 टक्के सवलतीत मिळणार; स्वस्तात घर घेण्याची मोठी संधी, येथे क्लिक करून पहा बातमी..

म्हाडाचा हा 2 बीएचके फ्लॅट कुठे आहे? आणि किंमत किती?

म्हाडाच्या पुणे मंडळाकडून अलीकडेच 4 हजार 882 एवढ्या घरांची सोडत (Mhada Lottery 2024) जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या सोडतीअंतर्गत विविध ठिकाणी विविध घरे उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुण्यातील ताथोडे (संकेत क्र.644 ) येथे म्हाडाचे 2 बीएचके घरे उपलब्ध करण्यात आले आहे. इडन गार्डन (Eden Garden) नावाचा हा रोड टच प्रोजेक्ट असून या प्रकल्पात 851 चा कार्पेट एरिया मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे या घराची मूळ किंमत 68 लाख रुपये असल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं आहे. आणि 851 एवढा कार्पेट एरिया येथे जवळपास कुठेच मिळत नाही आणि जर एवढा कार्पेट एरिया मिळाला तर त्याची किंमत 1 कोटीच्या पुढे जाते अशी माहितीही कर्मचाऱ्याने दिली. तसेच लवकरात लवकर संधीचा लाभ घेण्याची विनंती या कर्मचाऱ्याने केली आहे.

व्हिडिओ पहा

3 thoughts on “काय सांगता! आता लॉटरी शिवाय घ्या म्हाडाचा 2 BHK फ्लॅट; मिळतील भरमसाठ सुविधा, पहा लोकेशन, सॅम्पल फ्लॅट आणि किंमत..!”

Leave a Comment