म्हाडाचं घर लॉटरीत लागल्यानंतर आपण ते भाड्याने देऊ शकतो का? पहा काय आहे नियम..!

मुंबई : सध्या मुंबईतील रिअल इस्टेट (Real Estate Mumbai) क्षेत्राची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कारण याठिकाणी जमिनीला आणि घरांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे घरांचे दर देखील आभाळाला जाऊन टेकले आहे. मुंबईत घरांचे प्रचंड वाढलेले दर सामान्य माणसाला घराचे स्वप्न पूर्ण करू देत नाही. त्यामूळे म्हाडा आता घरांची लॉटरी (Mhada Lottery) काढून सामान्य परिस्थिती असलेल्या लोकांसाठी कमी किमतीत घर उपलब्ध करून देत आहे.

सध्या मुंबईत अनेकांना घरांची गरज आहे. त्यामुळे म्हाडाकडे घरासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्हालाही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर आता तुम्ही मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी (Mhada Flats Mumbai) अर्ज करू शकता. महत्त्वाचं म्हणजे म्हाडाच्या या घरांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विरार-बोळीज याठिकाणी म्हाडाची 2,278 एवढी घरे असून या घरांसाठी 1,060 एवढे अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे याठिकाणी असलेला पाण्याचा प्रश्न आता दूर झाला आहे. त्यामुळे आता अर्ज करणार्‍यांची संख्या वाढली आहे. या प्रकल्पातील शेवटचे घर विक्री होईपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती सुरू असणार आहे. आता ही घरे लवकरच विकली जाणार असल्याचा विश्वास कोकण मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईतील या लोकांना लागली घरांची लॉटरी, यात तुमचे नाव आहे का? येथे क्लिक करून पहा..

म्हाडाचे घर भाड्याने देता येते का? (Mhada Flats)

म्हाडाच्या लॉटरीमधून घर मिळाल्यानंतर अनेकांना एक प्रश्न पडत असतो. म्हाडाचे हे घर मिळाल्यानंतर ते भाड्याने देऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. म्हणून याठिकाणी म्हाडाचे घर भाड्याने देता येईल का? अशी महत्वाची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत. असं समजा तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आणि ते घर तुम्हालं लागलं तर तुम्हाला ते घर भाड्याने द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, फक्त त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडून एनओसी (NOC) घ्यावी लागेल. घर भाड्याने देण्यापूर्वी योग्य ती कागदपत्रे जमा करण्याच्या बाबतीत वकिलांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

म्हाडाचे घर घेणार्‍यासांठी गुड न्यूज; आता मिळणार ही नवीन सुविधा, येथे क्लिक करून पहा बातमी..

Leave a Comment