Mhada Flats Mumbai : मुंबईमधील 4 हजार 82 एवढ्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमधील तब्बल अडीचशे पेक्षा जास्त घरे काही कारणांमुळे म्हाडा अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहे. नियमानुसार ही घरे प्रतीक्षा यादी मधील विजेत्यांना वितरित करणे गरजेचे होते. पण प्रतीक्षा यादीच शिल्लक न राहिल्याने मुंबईतील ही म्हाडाची घरे (Mhada Flats Mumbai) आता रिक्त राहणार आहेत. आता या घरांचा समावेश मुंबई मंडळाच्या पुढील सोडतीत केला जाणार असून पुन्हा या घरांसाठी अर्ज करता येऊ शकतो.
Mhada Flats Mumbai
घरांची किंमत परवडत नाही, वेळेवर पैसे भरणे शक्य न झाल्याने, पती तसेच पत्नीचे उत्पन्न न दाखवणे, एकापेक्षा जास्त घरे सोडतीमध्ये लागणे यासह अजून अनेक कारणांमुळे मुंबई मंडळाकडे अडीचशे पेक्षा जास्त घरे (Mhada Flats) परत आली आहेत. या घरांच्या वितरणासाठी प्रतीक्षा यादीच शिल्लक नसल्याचं लक्षात आलं आहे. पूर्वीसारखी शंभर टक्के प्रतीक्षा यादी असती तर ही घरे उरली नसती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. आता म्हाडाने किमान 1 आणि कमाल 10 टक्के याप्रमाणे प्रतीक्षा यादी निश्चित केली आहे. मधल्या काळात म्हाडाकडून प्रतीक्षा यादी ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसे झाले असते तर अजून बरीच घरे शिल्लक राहिली असती.
खुशखबर! म्हाडाच्या या घरांची 70 टक्के दुरुस्ती पूर्ण; दिवाळीनंतर एवढ्या लोकांना मिळणार घराची चावी, येथे क्लिक करून पहा बातमी..
आता म्हाडाने (Mhada) प्रस्ताव पाठवून पूर्वी सारखीच प्रतीक्षा यादी असावी तसेच प्रतीक्षा यादी किती असावी, याचे सर्व अधिकार म्हाडाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर म्हाडाला पुन्हा पूर्वी सारखी प्रतीक्षा यादी ठेवता येणार आहे. पूर्वीच्या काळात ही प्रतीक्षा यादी प्रतेक वर्षी कायम असायची. आता प्रतीक्षा यादीची मुदत वर्षभर ठेवण्यात यावी, असे प्रस्तावामध्ये म्हटले गेले आहे.
काय सांगता! आता म्हाडाचे घर विकण्यासाठी खासगी कंपनी मैदानात; आता घरांच्या किमतीत झाला मोठा बदल, येथे क्लिक करून पहा बातमी..
मुंबई मंडळाकडून 2019 मध्ये झालेल्या सोडतीमध्ये एकास पाचशे याप्रमाणे प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. त्यामुळे त्या वर्षीच्या सोडतीमध्ये फारशी घरे शिल्लक राहिली नव्हती. महत्त्वाचं म्हणजे जेवढी घरे तेवढीच प्रतीक्षा यादी ठेवण्याची अशी म्हाडाची पद्धत होती. मुंबई सोडून इतर मंडळामध्ये ही यादी एकास पाचशे किंवा त्यांना आवश्यकता असेल तशी ठेवण्याची मुभा त्यामुळे संबंधित मंडळांना मिळणार आहे.
खुशखबर! आता घ्या चॉईस फॉर्म भरून पाहिजे तिथे घर; येथे क्लिक करून पहा बातमी..
म्हाडाच्या सोडतीबाबत सुरेश कुमार समितीकडून देण्यात आलेल्या अहवालामध्ये प्रतीक्षा यादी किती पाहिजे या संदर्भात काहीही भाष्य करण्यात आलेले नाही. म्हणून प्रतीक्षा यादी किती पाहिजे याचा निर्णय प्रत्येक सोडतीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो यानुसार निश्चित करता येईल. त्यामुळे गरजू व्यक्तीला घर मिळण्यास मदत होईल, याकडे या अधिकाऱ्याने लक्ष वेधले आहे.